

वसई(प्रतिनिधी): नुकतेच मनुष्यबळ विकास लोकसेवा आयोग मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासमेलन 2020 मुंबई येथे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या ऑनलाइन महासमेलनात जि. प. शाळा जांभुलपाडा केंद्र भाताने तालुका वसई च्या शिक्षिका विद्या नाईक यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव ,” शिक्षकरत्न ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या महासमेलनात 101 गुणिजनांचा गौरव ऑनलाइन पद्धतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.मानाचा फेटा,मानकरी बॅच गौरवपदक,सन्मानचिन्ह,आणि महावस्त्र व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
वसईतील नाळा येथील विद्या नाईक या 1997 पासून शिक्षकी सेवेत असून त्यांनी गेली 24 वर्षे आदिवासी बहूल क्षेत्रात काम केले आहे.आदिवासी भागत सेवा बजावीत असताना नवनवीन उपक्रम राबविण्याचे कार्य,तसेच तळमळीची व विध्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून ,काळाशी सुसंगत शिक्षण क्षेत्रातील बदल आत्मसात करत विध्यार्थी हित हेच ध्येय मानून हे कार्य त्या करत आहेत.त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.