
श्री. विनीत यशवंत वर्तक , उमेळा ह्यांच्या आईचे निधन दि. १२ सप्टेंबर ,२०२२ रोजी झाले. स्व. शालिनी यशवंत वर्तक ह्यांचे वय ८३ होते. विनीत आणि कुटूंबियांनी देहदानाचा निर्णय घेतला. ह्या कामी देहदान चळवळीचे प्रणेते श्री पुरुषोत्तम दादा पवार पाटील ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.देहदानाबरोबरच त्वचादान ही झाले.
ह्या प्रसंगी देहदानाबाबत प्रबोधन करताना श्री पवार ह्यांनी अवयव दान व देहदानाचे महत्त्व व गरज ह्या बद्दल माहिती दिली. देहाची राख होण्यापेक्षा मृत्यूनंतरही आपण अश्या ह्या पवित्र दानाने लोकांच्या कामी येऊ शकतो. त्वचादानाने भाजलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करून त्यांचा जीव वाचू शकतो व एक नवीन जीवन त्यांना लाभते. देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानवी देहाची परिपूर्ण व सखोल माहिती होते. श्री पवार ह्यांनी लोकांनी ह्या कामी पुढाकार घ्यावा व आपण त्यांना सहकार्य करण्यास सदैव तयार आहोत असे नमूद केले.
तसेच आज सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश वनमाळी, वसई ह्यांच्या आई श्रीमती कुमुदिनी केशव वनमाळी, वय ८५ ह्यांचे निधन झाले. त्यांचे ही त्वचादान झाले.
————