वसई-वसईत काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनिल अलमेंडा यांच्या नेतृत्वाखाली  उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील गंभीर घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन केलं. मात्र या आंदोलनातच उत्तर प्रदेश सरकार विषयी पत्रकारांना माहिती देण्यासाठी तिथे उभे असताना कोणा एका कार्यकर्त्यांनी बॅनर खेचल्याच्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली.
हा सर्व  प्रकार या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसईतील  डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झाला आणि हा वाद इतका वाढला की यात दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ही झाले आणि या सर्वांनी सत्याग्रह आंदोलन बाजूला सारीत आपल्याच काँग्रेस कार्यकर्त्याना मारहाण केली. अखेर बऱ्याच वेळांनी काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सोडवणूक करीत तेथून पळ काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *