
वसई, दि. २८ मे २०२५ — वसईच्या सामाजिक व राजकीय इतिहासात मोलाचा वाटा उचलणारे थोर समाजवादी नेते आणि माजी आमदार प्रा. स. गो. वर्टीसर यांच्या जयंतीनिमित्त “सद्य:ची सामाजिक व राजकीय परिस्थिती” या विषयावर एक महत्त्वपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाचे आयोजन प्रा. स. गो. वर्टी मेमोरियल ट्रस्ट मार्फत रविवार, दिनांक १ जून २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता लायब्ररी हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, वसई (पश्चिम) येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व लोकमत दैनिकाचे संपादक मा. श्री. संजय आवटे आपले विचार मांडणार आहेत.
प्रा. वर्टीसर हे १९५२ ते १९६२ या काळात आमदार म्हणून कार्यरत असताना निस्पृह, चारित्र्यसंपन्न व व्यसंगी नेतृत्वाचे उत्तम उदाहरण होते. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनापासून हरित वसई आंदोलनापर्यंत त्यांनी समाजहितासाठी अखंड झुंज दिली. त्यांच्या त्यागी जीवनातून स्फुरण घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक उपक्रम राबवले जातात.
या कार्यक्रमाला वसईतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व विचारवंत यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. स. गो. वर्टी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.