
वसई (प्रतिनिधी) मागील दोन वर्षात कोविड – १९ या साथ आजाराने थैमान घातलं होत सर्वत्र भीतीचे आणि कोंदट वातावरण निर्माण झालं होत या आजारात अनेक लोकांचे जवळचे नातेवाईकावर काळाने घाला घातला आहे. अनेक गावं पाड्यात कुटुंबात दुःख आहे, शोक आहे आता हळूहळू जनजीवन पूर्ववत होऊ लागले आहे. मात्र तरीही या संकटाची भीती अद्याप मनात घुसमटत आहे. अशा या वातावरणातून समाजाला बाहेर काढणे महत्वाचे आहे त्यासाठी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर होणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वसईतील आभाळमाया साहित्य, कला, नाट्य प्रसारक मंडळाने उद्या रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ठीक ४.३० वाजता भंडारी नाट्यगृह पारनाका वसई वेस्ट येथे धनंजय माने इथच राहतात या तुफान विनोदी नाटकाचे आयोजन केले आहे या नाटकाची निर्मिती श्रीमंत एंटरटेंमेंट प्रा.ली. व्हीं आर प्रोडक्शन ची आहे, नाटकाचे निर्माते प्रिया बेर्डे, अमर गवळी, सायली गवळी आहेत तर कलाकार स्वानंदी बेर्डे, निमिष कुलकर्णी, मृगा बोडस, नीलम घेसास, चेतन चावडा, प्रिया बेर्डे, व प्रभाकर मोरे आहेत. या नाटकाचे लेखक नितीन चव्हाण आहेत दिग्दर्शक राजेश देशपांडे नेपथ्य संदीप बेंद्रे, संगीत दिलंय अमीर हटकर आणि नाटकाचे सूत्रधार आहेत गोटया सांवत आहेत. हे विनोदी नाटक असून मागील आठ दिवसांपासून या नाटकाची तिकीट विक्री सुरू झाली आहे या नाटकाला वसईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविड नंतर वसई करांचा चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम हे नाटक करून जाईल असा विश्वास या नाटकाचे आयोजक आभाळमाया मंडळाचे अध्यक्ष तथा आपला उपनगर चे कार्यकारी संपादक डॉ अरुण घायवट , खजिनदार संध्या गायकवाड, दीपक बडगुजर, सलीम पटेल, चरण घायवट, पद्माकर पडवेकर, प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.