वसई ( प्रतिनिधी) आभाळमाया साहित्य, शिक्षण, कला, नाट्य विकास मंडळ आणि मीडिया पार्टनर तुषार प्रकाशन वसई कडून येत्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता पी. पी. पैरेडाइज हॉल, वसई रोड अंबाडी रोड, गुरुद्वाराचे शेजारी राज्यस्तरीय स्वरचित कविता वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी कवी कवयत्रीनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तुषार प्रकाशन वसई कडून तुषार दिवाळी अंकाच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्या निमित्त दरवर्षी कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या प्रकाशनाच्या माध्यमातून दैनिक आपला उपनगर हे वृत्तपत्र दररोज प्रकाशित होत असते. तसेच ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा दरवर्षी सन्मान केला जातो त्याच बरोबर या प्रकाशनाने आज पर्यंत विविध विषयाची १०० चे वर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. साहित्य क्षेत्रात या प्रकाशनाचे नाव खूप मोठे आहे. त्याच बरोबर आभाळ माया या मंडळातर्फे वसईत सातत्याने नाटकाचे आयोजन केले जात आहे तसेच साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात यश मिळविणाऱ्याचां सन्मान ही केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कवी कवयत्रीना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे कौतुक करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम येणाऱ्या कवीला रुपये ५००० चे बक्षीस व ट्रॉफी तर द्वितीय पारितोषिक २५०१ रुपये व ट्रॉफी, तृतीय १००१ रुपये व ट्रॉफी, उतेजनर्थ ५०१ रुपये व ट्रॉफी तसेच प्रत्येक सहभागी कवीला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी ज्या कवी आणि कवयत्रीना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या नावाची नोंद डॉ. अरुण घायवट मोबा ९५४५६२३०९२ आणि संध्या गायकवाड मोबा. ८६८९८६४४०० वर संपर्क साधावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *