वसई : मंदिरे सुरू करा या मागणीसाठी भाजपच्यावतीने आज सकाळी 11 वाजता भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वात जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वसई तालुक्यात घंटानाद आंदोलन पार पडले.
वसईतील बाभोळा-साईबाबा मंदिर, माणिकपूर- हनुमान मंदिर, दिवाणमान-नागेश्वर मंदिर, समता नगर-गणेश मंदिर, ओमनगर-गणेश मंदिर, शास्त्रीनगर-गणेश मंदिर, नवघर पूर्व- अंबामाता मंदिर, वसंतनगरी-राधाकृष्ण मंदिर, इव्हरशाईन-शक्तीधाम मंदिर आदी मंदिरांमध्ये मंदिरे सुरू करा या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आले. यामुळे सकाळी 11 वाजता संपूर्ण वसई-विरारमधील मंदिरे घंटानादाने दुमदुमल्याचे दृष्य पहायला मिळाले. यावेळी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद” करत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला गेला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसई रोड मंडळ अध्यक्ष रामनुजम, शेखर धुरी, रमेश पांडे, अमृत मानकर, अपर्णा पाटील, राजदेव सिंग, संध्या सिंग, विनोद कुमार, संजय सिंग, मार्टिव कोलासो, श्रीकुमारी मोहन, दिनेश मकवाना, एन. जे. इच्छापूरीया, सुधांशू चौबे, सुरेश देशमुख, सुरेश प्रजापती, मयांक सेट, जितू वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात भक्तांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *