
प्रतिनिधी : वसई उप विभागिय अधिकाऱ्यांचा एक असा प्रताप समोर आला आहे की, उप विभागीय अधिकाऱ्यांनी जमिनीचा मोबदला चक्क दुसऱ्याच व्यक्तीला दिला आहे. आणि आता मोबदल्याचा धनादेश परत शासनाकडे जमा करण्याबाबत सदर व्यक्तीला पत्र देण्यात आले असून त्या व्यक्तीला दिली गेलेली रक्कम शासनाकडे जमा करण्याकरिता त्या व्यक्तीने १ वर्षाचा वेळ मागितला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गाव मौजे शिरगाव ता. वसई येथील सर्वे नंबर २९४/३, २९४/५, २९४/७ व २९४/९ क्षेत्र ०.०६७० हे. आर. ही जमीन मिळकत वेस्टर्न।डेडिकेटेड फ्रेट कोरीडोर या रेल्वे प्रकल्पात बाधित झालेली आहे. सदर संपादित ०.०६७० हे. आर. क्षेत्राचा मोबदला रक्कम रुपये १७,३७,३२७/- इतकी रक्कम तुळशीराम वासुदेव पाटील यांनी धनादेश क्रमांक ०५६७५४ धनादेश दि. २३/५/२०१६ रोजी स्वीकारला आहे.
तद्नंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील दुरुस्ती संयुक्त मोजणी पत्र विवरण पत्रानुसार तुळशीराम वासुदेव पाटील यांचे यांचे क्षेत्र ०.०६७० हे. आर. न जाता ०.०२०० हे. आर. एवढेच क्षेत्र संपादित होत असून उर्वरित भूसंपादित क्षेत्रापैकी लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील व इतर यांचे ०.०३५१ हे. आर. व प्रशांत रमेश धोंडे यांचे ०.०११९ हे. आर. इतके क्षेत्र संपादित होत असल्याचे भूमी अभिलेख यांच्या अहवालात नमूद आहे. सदर दुरुस्ती अहवालाच्या अनुषंगाने उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फ़त क्र. व्हीडी/टे-२/डीएफसीसी/कावि-१७०/२०२१ दि. २१/१०/२०२१ अन्वये तुळशीराम वासुदेव पाटील यांना जास्तीची अदा केलेली मोबदला रक्कम उप विभागीय अधिकारी कार्यालयास परत करण्याबाबत कळविले होते. तुळशीराम वासुदेव पाटील यांनी सदर प्रकरणी उप विभागीय अधिकारी कार्यालयास पत्र देऊन रक्कम परत करण्याकरिता १ वर्षाचा कालावधी मागितला आहे.
सदर प्रकरणात चूक कोणाची आहे हे स्पष्ट व्हावे व सदर प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी.