प्रतिनिधी :
वसईच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात गणेश घुगे नामक खाजगी इसम जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात वावरत असून त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावे.सदर प्रकरणी उप विभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे यांनी कारवाई न केल्यास या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली जाईल याची नोंद उप विभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसईच्या उप विभागीय अधिकारी कार्यालयात गणेश घुगे नामक खाजगी इसम जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात वावरत असून शासकीय कार्यालयात खाजगी इसम काम करणे चुकीचे आहे. या बाबत शासनाचे परिपत्रक ही आहे. गणेश घुगे हा दलाल उप विभागीय अधिकारी कार्यालयात बसलेलाच असतो. अनेक प्रकारचे दाखले बनवून देण्याचे काम गणेश घुगे करतो. त्या करिता लोकांकडून पैसे उकळतो. उप विभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे यांची दिशाभूल करून त्याने धैर्य नितेशकुमार वाघेला व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखल आवश्यक कागदपत्रे नसताना बनविले असून त्याची चौकशी करून हे दाखले रद्द करण्यात यावेत याकरिता तक्रार दाखल केलेली आहे.
गणेश घुगे हा उप विभागिय कार्यालयाच्या बाहेरील कंटेनरमध्ये वातानुकूलित दालनात बसून असतो. उप विभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करून गणेश घुगे याला कंटेनरमध्ये बसण्यापासून मनाई करावी. सदर प्रकरणी कारवाई न केल्यास उप विभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे यांच्या आशीर्वादाने गणेश घुगे हा कंटेनरमध्ये वातानुकूलित दालनात बसत असल्याचे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *