वसई : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात वसई-विरारमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 250 ते 300 एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारी रेकॉर्डवर यातील एक रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्याने वसईतील नागरिकांनी धसका घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर वसईतील हथिमोहल्ला आणि कोळीवाडा परिसरात योग्य प्रबोधन होत नसल्याने नागरिक भीतीच्या छायेख़ाली आहेत. इतक्या मोठ्या संकटानंतरही येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक गायब असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान; घाबरलेल्या नागरिकांनी या भागात तातडीने रुग्णालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नगरसेवक आणि तथाकथित समाजसेवक समजणाऱ्या व्यक्तीनी आपल्या भागात लक्ष ठेवणे अपेक्षित होते; मात्र अशा संकट समयी हे नेतेच गायब आहेत. त्यामुळे नागरिकांना पड़त असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला कुणी मायबाप राहिलेला नाही.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचा वाढता आकड़ा लक्षात घेता वसईतील नागरिकांनी धसका घेतला आहे. आगामी काळात या भागात रुग्ण सापडल्यास पालिका प्रशासन कशी व्यवस्था करणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर या भागात तात्काळ रुग्णालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *