
आज शनिवार दि. ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुपारी ४:००वा. काँग्रेस भवन पारनाका वसई येथे महाराष्ट्र बंद बाबत महाविकास आघाडी तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती
ह्यावेळी बोलताना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजारमजी मुळीकसाहेब ह्यांनी उत्तरप्रदेश लखीमपूर खेरीव येथे मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार अत्यन्त निंदनीय आहे असे सांगितले व महाविकास आघाडी सरकार ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.ह्या झालेल्या निंदनीय प्रकारा बाबत महाविकास आघाडीने एक दिवस भारत बंद चे आव्हान केले आहे ह्या आव्हानाला साद देत सगळ्यांनी म्हणजेच रिक्षा दुकानदार,प्रवाशी वाहने ह्यांनी कडकडीत बंद पाळावा असे आव्हान सगळ्यांना करण्यात येत असल्याचे सांगितले ह्यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील अलमेडा, शिवसेना वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर तसेच
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिरी यांची उपस्थितीत होते