

रविवार दिनाक २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिना निमित्त मी वसईकर अभियानाच्या वतीने “वसई जो डो- भारत जो डो “हे अभियान राबविण्यात येणार आहे.स्वीकारले संविधान व त्यानुसार देशातील प्रजेच्या हितासाठी प्रजेची सत्ता हि संकल्पना आस्तित्व आली. परंतु देशातील वास्तव व परिस्थिती पाहता संविधानाच्या मूळ गाभ्या पासून आपण दूर जात आहोत का ?असा प्रश्न निर्माण झालेला आहे. “संवाद” हे लोकशाहीचे मूळ तत्व असताना शासन व प्रशासनाचा जनतेशी संवाद संपत चालल्याचे दुर्देवी चित्र दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वधर्म समभाव हि संस्कृती असलेल्या तसेच सर्वच दृष्टीने जागृत असलेल्या वसईकरांशी या विविध विषयावर व प्रश्नावर “संवाद” साधण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वसईकरांच्या हाताला तिरंगी रंगाचे ” देश बंधन” बांधण्यात येणार असून,संविधानाच्या उधेशिकेचे वाटप करून जनतेमध्ये संविधानाच्या उधेशा विषयी जागृती करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम चिमाजी आप्पा मेदान वसई गाव या मेदा नाच्या मुख्य गेट जवळ आयोजित केलेला आहे.कार्यक्रम हा शासकीय ध्वज वंदना चा कार्यक्रम संपल्यावर सकाळी १० ते दु १२ या वेळेत होणार आहे.सर्व लोकशाही प्रेमी वसईकर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी ह्या अभियानात सहभागी व्हावे.