
वसई तालुक्यातील आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या पासुन झोपड्या ( घरे ) बांधून राहत असलेले आदिवासी पाड्याच्या सरकारी जागा , भूमाफिया , दलाल , कोळंबी प्रकल्पवाले यांच्या घश्यात घालून , आदिवासी समाज्याच्या लोकांना उद्धवस्त करण्यासाठी शेठसावकारांना मदत करून वसई तालुक्यातून आदिवासी , गोरगरीब , समाज्याला वसई तालुक्यातून उध्दवस्त करण्याचे नियोजन बध्द कट कारस्तान रचून करण्याचे काम वसई तहसिलदार उज्वला भगत करित आहेत
वसई तालुक्यातील सरकारी जागेवरील आदिवासी पाड्यांच्या तसेच शेठ सावकारांच्या वाडीत पिढ्यान पिढ्या पासुन घरे बांधून राहत असलेल्या आदिवासी गोरगरीब लोकांच्या घरांचा सर्वे करून त्या घरा खालील जागा घर मालकाचे नावे करून त्याची ७/१२ व तालुका नकश्या व गाव नकाश्यावर नोंद करणे यासाठी आदिवासी एकता तर्फे सतत पाठपुरावा चालू आहे त्या बाबत , त्या बाबत क्र. 14/03/2013 – PMP3 /50710 दिनांक 10/05/2013 रोजी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली यांचे पत्र , क्र.अ.का./वी. आय.पी / 8636 दिनांक 27/01/2014 मा. सोनिया गांधी यांचे कार्यालय 24 अकबर रोड नवी दिल्ली यांचे पत्र , तात्कालीन मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब यांना कळविण्यात आले होते त्या नुसार महाराष्ट्र शाशन महसुल व वन विभाग मंत्रालय यांचेकडील पत्र व संकिर्ण २०२१ / सं.क्र.९६१ / ज – ४ ,अ, दिनांक ०२ /०९/२०१९ नुसार क्र.मु.म.स.BZ. 2/94585 जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते त्या नुसार वसई तालुक्यातील आदिवासी पाड्याची यादि मागवून तहसिलदार वसई व वसई विरार शहर महानगर पालिका व भूमि अभिलेखा वसई यांना कळविले होते , सदर्भ – क्र.महसुल / कक्ष- १/टे- १/ टेनन्सी कावि १२४५ /२०२१ दिनांक १५ /१२/२०२१ मा.सुरेद्र नवले निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र , क्र. व.वि.श.म./ उप.आ./५१/२१-२२ दिनांक १५/११/२०२१ डाँ किशोर गवस उपायुक्त वसई विरार शहर महानगर पालिका यांचे पाड्याचा सर्वे करण्यासाठी नाहरकत पत्र , दिनांक २१/०४/२०२२ रोजीचे मा. खासदार राजेंद्र गावित यांचे पत्र या नुसार आदिवासी पाड्यांचा सर्वे करून त्या पाड्यांची नोद तालुका नकाश्यावर व गावनकाश्यावर करण्याचे कळविले आहे तसेच सदर प्रश्न तातडीने मार्गी लागावे म्हनून आदिवासी एकता परिषद तर्फे वसई तहसिलदार कार्यालय येथे मोर्चाेचे आयोजन करण्यात होते त्या वेळी देखिल दिनांक २८ /०४ /२०२२ रोजी अप्पर जिल्हादंडाधिकारी पालघर डाँ.किरण महाजन यांनी सदर मोर्चा होऊ नये म्हनून आदिवासी समाज्याच्या घरांचा सर्वेचा प्रश्न तातडीने सोडवा असे तहसिदार वसई व पोलिसाना लेखी स्वरूपात कलविले होते त्या बाबत तहसिलदार वसई यांना आदिवासी एकता परिषद कार्यकरते भेटले असता ते माझे काम नाही असे तोंडी सांगून जिल्हादंडाधिकारी यांच्या पत्राला व
वरील सर्व पत्राना तहसिलदार वसई यांनी केरांची टोपली दाखविली आहे त्या उलट आदिवासी पाड्यांचा विकास न करता आदिवासी समाज्याच्या लोकांना वसई तालुक्यातून उध्वस्त करण्यासाठी आदिवासी पाड्याच्या लगत कोळंबी प्रकल्प , भूमाफियाकडून माती भराव करून नैसर्गिग पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग कसे बंद करता येतिल जेणेकरून सदर पाड्यातील आदिवासी समाज्याच्या लोकांचे पावसाल्यात पाणी भरून अतोनात हाल होऊन जास्त प्रमाणात नुकसान व्हाव याकरिता तहसिलदार वसई ह्या जास्त प्रयत्न करित आहेत तसेच शेठ सावकारांच्या वाडीत घरे बाधून राहत असलेल्या आदिवासी समाज्याच्या लोकांना वेठबिगार्यासारखी वागनूक देऊन त्यांना जातिवाचक शिविगाल करणे , मारहाण करणे , महीलांचा विनयभंग करणे , त्यांचा येण्याजाण्याचा रस्ता बंद करणे , पिण्याचे पाणी बंद करणे , विज मिटर घेऊ न देणे , घेतलेले विज मिटर काढायला लावणे , आदिवासी समाज्याच्या लोकांना अंधारात ठेवणे , या बाबत वसई पोलिस ठाणे येथे अनेक तक्रारी , लेखी फिर्याद , तक्रारी अर्ज देऊन देखिल कोणतीही दखल घेतली जात नाही तसेच तहसिलदार वसई यांच्याबाबत सुधा वसई पोलिस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिले आहेत त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे साहेब हे गोपनिय विभागाचे सलगर व पी एस आय राहुल फड यांना हाताशी धरूनआदिवासी एकता परिषद कार्यकरत्याचा आवाज दाबण्यासाठी व आदिवासी समाज्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी तक्रार करणार्या व आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाेने मोर्चे काढणार्या आदिवासी समाज्याच्या लोकांची स्वताच्या खाजगी मोबाईल मधे परवानगी नसताना गुपचूप फोटो व विडीओ शुटिंग करून आदिवासी समाज्याच्या कार्यकरत्यावर खोटे गुन्हे नोंद करण्याचे काम करित आहेत तसेच तहसिलदार वसई व वरिठ पोलिस निरिक्षक कल्याणराव कर्पे हे आदिवासी समाज्याच्या लोकांना न्याय न देता भारतीय राज्य घटना , राजपत्र , सविंधानाचे आर्टिकल , कलम यामधे आदिवासी समाज्याच्या विकासाठी असलेले कायदे नियम याची पायमल्ली करून भूमाफिया , राजकारणी , दलाल , गुंड यांना पाठीशी घालून भारतीय राज्य घटना व राजपत्र यांचा अपमान करत आहेत म्हनून तहसिदार वसई उज्वला भगत मैडम , वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कल्याणराव कर्पे साहेब यांच्यावर त्वरित आदिवासी अत्याचार प्रतिबंधक ( एँक्ट्रासिटी अँक्ट ) कायद्यानुसार तसेच फौजदारी गुन्हे नोंद करून त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी आदिवासी एकता परिषद तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब , महसुल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब , गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य , आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी साहेब , पोलिस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य , काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब , यांच्याकडे निवेदन देऊन व काही प्रत्यक्ष भेटी घेऊन वसई तालुक्यामधे आदिवासी समाज्यावर तहसिलदार वसई व वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कश्या प्रकारे अन्याय करतात याचे कथन करून पुरव्यासहित तक्रारी निवेदन आदिवासी एकता परिषद वसई अध्यक्ष व पालघर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता सांबरे तालुका कमिटिचे वंदना जाधव , कविता उमतोल , गिता गरेल यांच्या तर्फे देण्यात आले या बाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे
या बाबत आदिवासी एकता परिषद तर्फे तहसिलदार वसई व वरिष्ठ पोलिस निरिक्षक वसई पोलिस ठाणे यांच्या विरूध्द लवकरच आंदोलन केेले जाणार आहे
