
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा
वसई तालुक्यात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांचे पेव वाढतच आहे .त्यातच भर म्हणून येथे पोमन येथे दिवसेंदिवस औद्योगिक अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. मागील दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी तसेंच विनापरवाना बांधकामे थांबवण्यासाठी प्रशासनास वारंवार विनंती केली जात आहे .परंतु जाणून बुजून प्रशासनाकडून या बांधकामांकडे दुर्लक्ष करून कारवाई न करता फक्त मोजमाप करून अकृषिक दंड लावण्यात येत आहे. वाघरळपाडा राजीवली तिवरी येथील अनधिकृत बांधकामामुळे मागील पंधरा दिवसांपूर्वी दोन निष्पाप जीवांचा बळी गेला ही बाब अत्यंत गंभीर असून बांधकामे सुरू असताना देखील निदर्शनास आणले असता प्रशासन हे बघ्याची भूमिका घेत आहे. ह्या अशा नियोजन शून्य विनापरवाना औद्योगिक तसेच निवासी बांधकामामुळे भविष्यात जीवितहानी, वित्त आणि होऊ शकते . अजून किती वसई-करांचे जीव जाणार तसेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून ही बांधकामे केली जात आहेत.
झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज माननीय तहसीलदार मॅडम यांना यांना घेराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून घेराव घालण्यात आला तसेच प्रशासनाच्या विरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक साहेब यांच्या नेतृत्वात घेराव आंदोलन करण्यात आले यावेळी माननीय तहसीलदार मॅडम यांनी शासकीय जागेतून जात असणारा रस्ता दोन दिवसात बंद करून सुरू असणारी बांधकामे आजच्या आज बंद केली जातील तसेच याआधी झालेल्या सर्व बांधकाम वर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून 20 ऑगस्ट पर्यंत चा वेळ त्यांनी मागितला आहे 20 ऑगस्ट पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन रस्त्यावर उतरून अत्यंत तीव्र करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी सांगितले