
विरार दि.९/०३/२०२२, मागील वर्षी वसई तालुक्यात तौकते वादळामुळे शेकडो घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करून अपादग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली होती व त्यानुसार महसूल कर्मचाऱ्यांकडून पात्र कुटुंबाच्या याद्या बनविण्यात आल्यात. मात्र प्रतेक्षपणे निरीक्षण केले असता शेकडो पात्र व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच नाहीत.
या विषयावरून असे लक्षात येते की, तहसीलदार वसई, श्रीमती उज्वला भगत स्वतः ह्या घोटाळ्यास जबाबदार असून त्या प्रशासक म्हणून कुचकामी ठरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महसूल विभागात अनेक घोळ झालेले असून त्यामुळे घरावरचे पत्रे सुद्धा त्यांनी खाल्ले नसतील ना? असा प्रश्न सदर योजनेतील पात्र व्यक्तींना पडत आहे.
आणि त्यामुळेच सदर प्रकरणी अनेक तक्रारी बहुजन समाज पार्टी कडे प्राप्त झाल्या असून या विषया बाबत १५ दिवसाच्या आत योग्य त्या यंत्रणे मार्फत चौकशी करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या हक्काच्या रकमा ताबडतोब वडत्या कराव्यात अन्यथा मंगळवार दि. २२/०३/२०२२ रोजी वसई तहसील कार्यालया समोर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन समाज पार्टी चे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी दिला. आंदोलना दरम्यान घडणाऱ्या कोणत्याही परिणामास संबंधित अधिकारी व वसई तहसीलदार श्रीमती उज्वला भगत ह्या जबाबदार असतील. असेही प्रा. डी. एन. खरे यांनी सांगीतले.