
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावमुळे जगावर संकट आले आहे.त्यातच भारतामध्ये हा संसर्ग वाढल्याने भारत देश लॉक डाउन करण्यात आला.कामधंदे पूर्णपणे ठप्प झाल्याने हातावर पोट असणारे कामगार शेतमजूर बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. याची झळ वसई ग्रामीण भागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसली.शासन दाते NGO यांनी गार्जुवंतांना सहकार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे.आपल्या वसई तालुक्यातील ग्रामीण जनता भूकबळी ठरू नये या जैविक आपत्ती काळात अशा गरीब जनतेला आपल्या मदतीचा हातभार मिळावा म्हणून वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.श्री.भारत जगताप व गटशिक्षणाधिकारी मा.श्रीमती माधवी तांडेल यांनी प्राथमिक शिक्षकांना मदतीविषयी आव्हान केले.वसई जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी मदतीचे हे आवाहन स्वीकारले .ज्या ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नोकरी करून आपली उपजीविका होते त्या ग्रामीण भागात किंबहूना वसईतील गरजुवंत जनतेला या महामारीच्या संकटात त्यांना सहकार्य करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. या नैतिक दृष्टिकोनातून मान्यवरांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला,व अन्नधान्याचा 600 रुपयाच्या पॅकेजमध्ये तांदूळ डाळ मिठमिर्ची तेल साखर साबण अशा जीवनश्याक वस्तूचा समावेश करून असे 300 किट्स मा.गटविकास अधिकारी मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून वसईतील गरजूंना तसेच ग्रामीण जनतेला वाटप करण्यात येत आहे, हे सर्व साहित्य जमविण्यासाठी वसई शिक्षक मित्रमंडळी चे प्रमुख शिक्षक मॅन्युअल डाबरे, रमेश जाधव ,रवींद्र घरत, मोहन पाटील,डेनिस मच्याडो,संगीता पाटील,किशोर मोहिते,प्रकाश उबाळे,यांनी पुढाकार घेतला तर विजय अमरनाथ सिंह यांनी अन्न धान्याचे स्वस्त दरात पॅकेज तयार करण्याचे काम केले,याशिवाय शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली या लोकसेवेच्या कार्या साठी वसई प्राथमिक शिक्षकसंघटनेचे सर्व कार्यकर्ते केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक व वसईतील सर्वच शिक्षक यांनी अन्न धान्य वाटपाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहकार्य करून नेहमीप्रमाणेच गरजेच्यावेळी सहकार्याचे समाजसेवेचे पाऊल पुढे टाकलेले आहे.वसईच्या ह्या सेवाभावी दातृत्व असणाऱ्या शिक्षकांना मनःपूर्वक सलाम व गोरगरीब जनतेने आशीर्वाद दिलेले आहेत.