वसई विरार महापालिका मुख्यालयात “पत्रकार कक्ष” आणि परिवहन बस सेवेत पत्रकारांना मोफत प्रवासाच्या मागणीचे दिले निवेदन
वसई :-मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वसई विरार शहर महापालिका मुख्यालयात पत्रकारांच्या सोयीसाठी “पत्रकार कक्ष” स्थापन करावा तसेच पालिकेच्या परिवहन बस सेवेत पत्रकारांना मोफत प्रवास अथवा काही विशेष सवलत मिळावी या दोन महत्त्वाच्या मागण्या संदर्भात वसई तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार दि २३ मे रोजी दुपारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.या भेटीत वसई तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित ,संघाचे जेष्ठ मार्गदर्शक निरंजन राऊत , सचिव आशिष राणे ,खजिनदार अरुण सिंग यांनी महापालिका मुख्यालयात ‘पत्रकार कक्ष ” स्थापन करावा त्या सोबत वसई किंवा अन्य प्रभाग समिती कार्यालयात देखील पत्रकारांना बसण्यासाठी दालन व्यवस्था करावी तसेच शहरात पत्रकारांना पालिकेच्या परिवहन बस सेवेत मोफत प्रवास किंवा त्यावर काही विशेष सवलत मिळण्या संदर्भात देखील सविस्तर चर्चा करत आपले म्हणणे पटवून दिलेदरम्यान तासाभराच्या या भेटीत पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संघाने केलेल्या मागण्या व अन्य सूचना ऐकून घेतल्यावर त्यांनी ही स्पष्टपणे आपले विचार मांडत अत्यंत मधुर असा सुसंवाद साधलाकिंबहुना आयुक्तांनी याबाबत लवकरच आपण प्रशासकीय स्तरावर काय करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी बोलतो, माहिती मागवतो व आढावा ही घेतो मात्र संघाने केलेल्या दोन्ही मागण्या व अन्य सूचना या स्वागतार्ह आहेत असा आशावाद देखील निर्माण केलात्यामुळे संघाने घेतलेल्या आयुक्तांच्या या भेटीला एकार्थाने सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने व नेहमीच आयुक्त अनिलकुमार पवार यांचे पत्रकारांना सहकार्य मिळत असल्याने संघाच्या वतीनं आयुक्तांचे शेवटी आभार ही मानण्यात आले.या भेटीत संघाचे पदाधिकारी तथा कार्यकारी सदस्य म्हणुन सर्वश्री किरण पाटील ,राजू सोनी,अतुल मोटे,नरेंद्र पाटील, शिवकुमार शुक्ला आणि महेश पाटील आदी आवर्जून उपस्थित होते.