अपंग जनशक्ती संस्थेमार्फत सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मध्ये आपले बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभेचे उमेदवार आ.सन्मा.हितेंद्रजी (आप्पा) ठाकूर, नालासोपाराचे विधानसभेचे उमेदवार आ.क्षितीजजी ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार आ. राजेश पाटील यांना आमच्या संस्थेमार्फत वसई तालुक्यातील दिव्यांगांचा जाहीर पाठिंबा दिला आहे.
गेल्या दहा वर्षापासून दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी वसई तालुक्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देत असतो. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून सतत धडपड करत असतो. त्या धडपडीमध्ये आपण सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि वसईचे आमदार मा. हितेंद्रजी आप्पा ठाकूर, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रवीणाताई हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा आमदार क्षितिजदादा हितेंद्र ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेशजी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेतील दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी खर्च करून या निधीतून दिव्यांगांना मासिक अनुदान दिले जाते. 40% ते 59% दिव्यांगांना एक हजार रुपये मासिक अनुदान, 60% ते 79% दिव्यांगांना १५००रू. मासिक अनुदान आणि 80%ते 100% दिव्यांगांना 2000 मासिक अनुदान तसेच १८ वर्षावरील गतिमंद आणि मतिमंद दिव्यांगांना २००० रुपये मासिक अनुदान आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ दिव्यांगांना दोन हजार रुपये मासिक अनुदान दिले जाते तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ५००००रू. अनुदान दिले जाते आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये दिव्यांगांना सवलत दिली जाते. अशा योजनेचा लाभ जवळजवळ वसई तालुक्यातील 3500 पेक्षा अधिक दिव्यांगांना मिळत आहे. अशा अनेक योजना दिव्यांगांना वसई विरार शहर महानगरपालिकातून मिळवून देण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर तसेच नालासोपारा आमदार क्षितीज ठाकूर आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रवीणाताई हितेंद्र ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
बहुजन विकास आघाडीच्या वसई विभानसभेचे उमेदवार आमदार हितेंद्र ठाकूर,नालासोपारा विधानसभा उमेदवार आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार आमदार राजेश पाटील या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन वसई तालुक्यातील सर्व दिव्यांगांना अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *