• वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रशासक डी. गंगाधरण यांनी दि. २० जाने २०२१ रोजी जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र सदरच्या बैठकीस सर्वच आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना हेतू पुरस्सर डावलण्याचे काम वसई-विरार महानगरपालिकेचे प्रशासक डी. गंगाधरण यांच्याकडून करण्यात आले. दि. २० जाने २०२१ रोजी महानगरपालिकेने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस अनेक पक्षांना विश्वासात घेण्याचे डी. गंगाधरन यांनी टाळले असल्याचे दिसले.सदर बाब गंभीर घेत वसई तालुक्यातील सर्वच आंबेडकरी राजकीय पक्षांनी त्यात प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरिश दिवाणजी, बसपाचे प्रा. डि.एन. खरे, बहुजन पॅंथरचे एकनाथ निकम , रिपाई(अे) चे युवक जिल्हाध्यक्ष विजय धनगर , रिपाई (आ)चे उदय तांबे पँथर रिपब्लिकन सेनाचे पँथर संजय गायकवाड यांनी त्यांच्या पदाधिकारीसह उपस्थित राहुन प्रशासक डी. गंगाधरण यांच्या मनमानी व आडमुठेपणा सोबत वेगवेगळ्या पक्षांना दुजाभावाची वागणूक देण्याच्या मानसिकतेचा जाहीर निषेध केला. वसई-विरार शहराच्या राजकरणात सर्वच राजकीय पक्षांचा छोटा मोठा वाटा असुन प्रशासक मात्र हुकूमशाही राबवत असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या बैठकीस आमंत्रित न केल्याने अनेक पक्षांनी प्रशासक म्हणून डी. गंगाधरण त्यांच्यावर जनतेकडून अविश्वास दाखविण्यात येत आहे. डी. गंगाधरण यांनी मालमत्ते करा संबंधी घेतलेले निर्णय त्यांच्या अधिकारकक्षा बाहेरचे असल्याचे जाणकारांकडून बोलल्या जात आहे. मालमत्ता करामध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार नगर विकास विभागाकडे असल्याने प्रशासक आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. श्री. डी. गंगाधरण यांनी जनतेच्या विरोध जाऊन अनेक निर्णय घेतले ज्याचा मोठा अर्थिक बोजा नागरिकांना सोसावा लागत आहे. श्री. डी गंगाधरण आल्यापासून अनधिकृत बांधकामे जोरात सुरु झालेली दिसतात. श्री. गंगाधरण घेत असलेले निर्णय आडमुठीपणाचे होते हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अनेक विकास कामे आपण रोखून ठेवली असल्याने नागरीक त्रस्त झाली आहेत. रस्त्यातील नादुरुस्त खड्डे, मुर्दाड आरोग्य यंत्रणा, बंद पडलेली परिवहन सेवा, महापालिकेत सर्वच कर्मचारी आणि अधिकारी वर्गात पसरलेला प्रचंड भ्रष्टाचार रोखण्यास प्रशासक म्हणून श्री गंगाधरण हे पूर्णपणे विफल ठरले आहेत. तसेच प्रशासक म्हणून डी. गंगाधरन यांनी विविध पक्षा सोबत केलेला दुजाभाव यामुळे त्यांच्या कार्यकाळात निवडणुका सुद्धा निरपक्षपाती पणे होतील की नाही असा स्वंशय जनतेत व्यक्त होत आहे. तरी बैठकीला डावलल्या बाबत सर्वच आंबेडकरी राजकिय पक्षांची नैकतिक जबाबदारी स्विकारुन ८ दिवसात लेखी माफि मागावी अन्यथा संपुर्ण वसई विरार शहरातील जनता त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करेल व त्यास स्वतः डी. गंगाधरण जबाबदार असतील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
    यावेळि प्रामुख्याने आंदोलनकर्ते रिपाइचे डॉ. भगवान कांबळे, प्रफुल खंडागळे ,अमर साळवे , सुनील कवडे,
  • रिपाई युवा जिल्हा अध्यक्ष शफीकुर रहमान शेख
    बहुजन पॅंथरचे जिल्हाध्यक्ष महेश निकम,गणेश सावंत,मनोज जाधव , विजया रुखे ,आदित्य रुके, कुसुम गुप्ता सामाजिक कार्यकर्ते सुनिल बेडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *