राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक, विद्यार्थी, महिलांनी पुढे यावे.- तहसीलदार: डॉक्टर अविनाश कोष्टी
राज्य शासनामार्फत १ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे . या मध्ये विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे वसई तहसीलदार कार्यालय अंतर्गत देखील १ ऑगस्टपासून महसूल पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आजपर्यंत विविध दाखले कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्यमंत्री लाडकी बहिण अंतर्गत वसई विरार महानगरपालिका तहसील कार्यालय व इतर ग्रामीण भागातून 90 हजार अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत .अद्यापही कार्यक्रम सुरू आहे. पुढील आठवड्यात या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी नागरिक ,तरुण, तरुणी विद्यार्थी , महिला, यांनी पुढे यावे असे आवाहन वसई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांनी केले आहे. महसूल विभागा अंतर्गत महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवडा शुभारंभ ,मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती पाऊस आणि दाखले, युवा संवाद ,महसूल जनसंवाद ,महसूल इ प्रणाली ,सैनिक हो तुमच्यासाठी ,आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा , महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण महसूल पंधरवडा वार्तालाप. महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ अशाप्रकारे विविध लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन वसई तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे