

सोमवार दिनांक १५-०४-२०२४ रोजी वसई न्यायालयात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर ह्यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वसई न्यायालयात सदर कार्यक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.या कार्यक्रमासाठी वसई न्यायालयातील सर्व मा. न्यायाधीश आवर्जून हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.आनंद घरत ह्यांनी केले कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत त्यांनी लोकशाही आणि संविधानाचे महत्व ह्याच्यावर भाषण केले. अँड गिरीश दिवाणजी ह्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण करताना सांगितले की, बाबासाहेबांनी त्यांच्या विरोधकांच्याहि मानवी हक्काची पायमल्ली होणार नाही व त्यांचे लोकशाही वाचविण्यासाठी अशा वेळेस मला माझ्याच विरोधकांच्या बाजूने उभे राहावे लागेल इतके थोर विचार बाबासाहेबांचे देशाच्या लोकशाहीबद्दल आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण वसई सत्र व जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.श्री खोंगल साहेब ह्यांनी केले. त्यांनी त्यांच्या भाषणात संविधानातील कर्तव्ये आणि अधिकार ह्या विषयांवर सुंदर मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना पेढे वाटून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पक्षकार, इतर वकीलांबरोबर वसई तालुक्यातील चारही बार वकील संघटनेचे कमिटी सभासद व अँड.पी .एन.ओझा, अँड. एम. के. तिवारी, अँड. दिगंबर देसाई, अँड. दर्शना त्रिपाठी, अँड. जॉर्ज फॉरगोस, अँड. मनोज तिवारी,अँड. दिनेश आदमने,अँड. चेतन भोईर,अँड. दर्शना फाळके हे प्रामुख्याने आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ वकील अँड. भरत पाटील,अँड. आनंद घरत आणि अँड. पूनम जाधव पाटील ह्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअँड अविनाश विद्वांस सर, अँड नोवेल डाबरे सर,अँड स्मिता घायवाट मॅडम,अँड दीपक देसाई,अँड राजेश गायकवाड,अँड सबिया काझी,अँड सूचित म्हात्रे,अँड वर्षा भिराडे,अँड मनीषा तायडे,अँड वैभव पाटील, अँड प्रल्हाद राणा, अँड प्रमोद मिश्रा, अँड अमित देशमुख,
अँड सदाशिव हटकर,अँड नीलेशी खराते, अँड वंदना पटेल
अँड सरिता यादव व इतर अनेकांचे विशेष सहकार्य लाभले.