
लोकन्यायालयात दाखल व दाखलपूर्व अशी 3,593 प्रकरणे निकाली !
वसई दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे व जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, ठाणे श्री. ए.ज.मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली वसई न्यायालयात शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाची तडजोडीस पात्र तसेच दाखल तसेच दाखलपूर्व अशी एकुण 3,593 प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. एकंदरीत रु.5कोटी 56 लाखाची तडजोड झाली.
या लोकअदालतीत वसई विरार शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतुक पोलीसांनी ई चलनाव्दारे कारवाई करण्यात आलेली 7,014 प्रकरणे निकाली करण्यात येउन 28 लाख 40 हजार तिनशे रुपये दंडस्वरूपातील रक्क्म वसुल करण्यात आली, तसेच वसई-विरार शहर महानगरपालीकेची असलेली घरपट्टीची थकीत प्रकरणे ठेवण्यात आलेली असुन एकुण 552 प्रकरणामध्ये 3 कोटी 13 लाख 15 हजार रुपयांची घरपट्टीची थकीत असलेली रक्कम आकारण्यात आली व कौटुंबिक वाद विवादातुन अनेक दिवसांपासुन ताटातुट झालेल्या पती पत्नी यांची कौटुंबिक स्वरुपाची प्रकरणे लोकन्यालयाच्या माध्यमाने मिटविण्यात आली व दुरावलेल्या पती पत्नी व चिरमुडयांच्या जीवनात हास्य फुलविणारा हा दिवस ठरला.
या लोकअदालतीच्या आयोजन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश – 1 तथा अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती, वसई डॉ. सुधीर देशपांडे यांनी लोकांनी आपसातील असलेले किरकोळ स्वरुपाचे दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक वाद प्रकरणे व समज-गैरसमज अशा काही करणांमुळे दुभंगलेले संसार अशी प्रकरणे समोपचाराने मिटविण्यासाठी लोकन्यायालय हे उत्तम साधन असुन नागरिकांनी या संधीचा प्रत्येक लोकअदालतीत लाभ घ्यावा तसेच दिनांक 12/03/2022 च्या लोकअदालतीची लगेचच तयारी सुरु झाली असुन जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.