

(पालघर – वसई) न्यायालय परिसरात वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच गाडीतील सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडी पूर्णत: जळून खाक झाली आहे.पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला आगवसई पंचायत समितीची गाडी गॅरेजमधून दुरुस्ती होऊन पुन्हा पंचायत समितीकडे जात होती. यावेळी वसई न्यायालय परिसरात भर रस्त्यात या गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहीती मिळताच वसई-विरार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व युद्धपातळीवर ही आग विझवण्यात आली.