

विरार (प्रतिनिधी) : वसई-पापडी येथील मिडटाउन सोसायटीत असलेले रेशनिंग दुकान या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात यावे, यासाठी सोसायटीकडून दुकानदारावर दबाव येत असल्याची माहिती आहे.
मात्र रेशनिंगचे धान्य घेणारा सामान्य माणुस येथील आजुबाजूच्या परिसरातील असल्याने दुकान इतरत्र हलवणे शक्य नसल्याने या दुकानासमोर असलेली बैरिकेडिंग हटवावी, अशी विनंती दुकान मालकाने वसई तहसीलदारांकड़े केली आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या दुकानासमोर बैरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानात येणारे रेशनचा ट्रक लांब उभा करावा लागतो. त्यामुळे रेशन उतरवणाऱ्या कामगारांना त्रास सहन करावा लागतो व सामान घेणा-या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे सदर बाबतीत प्रशासनाने त्वरीत लक्ष घालणे आवश्यक आहे.