
प्रतिनिधी:
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे. केसरे भुईगाव हद्दीतील अवैध धंदेवाल्यांकडून बेफाम वसुली करीत असल्याचे वृत्त आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. अर्थातच पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात. भुईगाव पोलीस चौकीच्या हद्दीत येणाऱ्या रानगावमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूच्या भट्ट्या चालतात. त्याच प्रमाणे अवैध रेती उत्खनन करून चोरीच्या रेतीचे ट्रक पोलीस संरक्षणात भुईगाव चौकीजवळून निघतात. या सर्व अवैध धंद्यांचा हप्ता बी. जे. केसरे वसूल करतात. वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने बी. जे. केसरे वसुली करतात.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे. केसरे यांची वसई पोलीस स्टेशनमधून बदली झालेली असताना ही ते भुईगाव पोलीस चौकी सोडायला तयार नाहीत. कारण त्यांना या ठिकाणी चांगला आर्थिक लाभ होत आहे.
वसई पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाईबाबत सातत्याने आवाज उठवून वरिष्ठांकडे तक्रारी दाखल करून ही कारवाई होत नसल्यामुळे हप्त्याची रक्कम वरपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत आहे असे वाटत आहे ?