
प्रतिनिधी :
वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीत पापडी येथे आसिफ याचा मटका जुगाराचा अड्डा वसई पोलिसांच्या संरक्षणात चालत असून सदर मटका जुगाराच्या अड्डय़ावर कारवाईबाबत सातत्याने तक्रारी करूनही पोलीस कारवाई करीत नाहीत. आसिफ हा महिना ७० हजार रुपये हप्ता पोलिसांना देत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरा भाईन्दर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वसई पोलीस स्टेशन हद्दीत पापडी येथे आसिफ याचा मटका जुगाराचा अड्डा मागील अनेक वर्षांपासून चालत असून यां अड्डय़ावर अधून मधून थातूर मातुर कारवाई होते. मात्र ठोस कारवाई होताना दिसत नाही. हा अड्डा चालविणारा आसिफ हा महिना ७० हजारांचा हप्ता पोलिसांना देत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे या मटका जुगार अड्डय़ाला संरक्षण दिले जाते. विशेष म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी दिल्या तरी कारवाई होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की अगदी वर पर्यंत हप्ता पोहोचत आहे.
या अड्डा बंद करावाच लागेल. कारवाई न केल्यास प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.