

वसई, (तहसीन चिंचोलकर) : दिनांक 19 मार्च 2022 रोजी संध्याकाळी वसई प्लाझा येथे पत्रकारिता बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाभीमुख विविध विषयावर चर्चा झाली.पत्रकारितेच्या माध्यमातून येणारे वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सोडविता येतील असे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच चर्चेची सुरुवात सर्व प्रथम विजय खेतले (स.संपादक वसई विकास) यांनी मांडले ते म्हणाले कि जर वसई तालुक्यात विकासाचा पाया मजबूत करायचा असेल तर प्रत्येक वसई तालुक्यातील पत्रकाराने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे तर त्याचा उपयोग आपण समाज उन्नती व प्रगती साठी करू शकतो,या पुढे प्रभात समाचार चे संपादक भालचंद्र होलम यांनी सूत्रसंचालन सोबत आपले विचार मांडले व ते म्हणाले पत्रकारिता करताना येणाऱ्या अडी-अडचणीसाठी शासन – प्रशासनाचा उपयोग ही पत्रकार करू शकतो आज पत्रकारिता करण्यासाठी जगात अनेक सोशल मीडिया , डिजिटल मीडिया सुविधा उपलब्ध झाली आहेत, ज्याचा उपयोग कोणताही पत्रकार करून तो समाजातील अनेक प्रश्नांचा वाचा फोडू शकतो. वसई तालुक्यातील औद्योगिक, शहरी व ग्रामीण भागातील असे अनेक प्रश्न आहेत जे प्रगतीपथापासून आज ही वंचित आहेत, जिथे आजही शासनाच्या सुविधा पोहचत नाही ते पोहचविन्यासाठी विविध संस्थेमार्फत पत्रव्यवहारा द्वारे पत्रकारांच्या मदतीने त्या सोडावीता येते. तसेच पुढील चर्चेचा विषय असे होते कि वसई तालुक्यात काही बोगस पत्रकार खरी पत्रकारिता मलीन करीत असल्याचे दिसून येते अश्या लोकांवर शासनाने कसून कार्यवाही करावी. दुसरी बाजू मांडताना खेतले साहेब म्हणाले कि पत्रकारांना ही घर-दार असते त्यासाठी शासनाच्या मूलभूत सुविधा व हक्क त्यांना मिळाले पाहिजे यासाठी ही आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील महिला पत्रकारांना ही सुविधा मिळाली पाहिजे,तसेच वसई तालुक्यातील पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजे तसेच या बैठकित वसई विकासचे संस्थापक संपादक विजय खेतले( सचिव वसई विरार महानगर पत्रकार संघ)आमची मुंबईचे संपादक अरुण सिंग( खजिनदार वसई तालुका पत्रकार संघ, प्रभात समाचारचे संपादक भालचंद्र होलम (सचिव संपादक पत्रकार सेवाभावी संस्था) शिवांश न्यूज चे संपादिका/युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला ( अध्यक्षा युनिटी मीडिया प्रेस क्लब), कॅपिटल वर्ल्ड चे संपादिका/ स्त्री दर्पण मासिकाचे संपादिका (खजिनदार युनिटी मीडिया प्रेस क्लब), युवाशक्ती एक्सप्रेस संपादक तुषार गायकवाड,मजदूर की मुंबई पत्रकार राजेश शर्मा, रायन डायस उपसंपादक मुंबई कामगार मित्र, अशद मुल्ला संपादक वसई केसरी, वसई वैभव संपादक हरेश मोहिते,मच्छिंद्र चव्हाण संपादक जनहित एक्सप्रेस, परवेज अहमद सिद्दीकी संपादक वसई जनमत, अमोल गायकवाड संपादक कामगार नेता, रफिक मेमन संपादक मेमन फास्ट, सुबह से शाम तक खबरे पत्रकार राज किशोर तिवारी, बाबाजी एस.शिंदे पालघर समाचार, विनय तिवारी स्वर्णीम प्रदेश,पत्रकार श्रीधर यशवंत पाटील ,
बुलंद क्राईम समाचार संपादक विजय जावकर, मुंबई केसरी टाईम्स संपादक विश्व प्रताप सिंह, शिंदे पालघर न्यूज भगवान शिंदे ,देवी पूजक पत्र चे संपादिका लक्ष्मी पटेल, पत्रकार विवेक सिंह, पत्रकार नितीन ठाकूर, पत्रकर मनीष कुमार राय, शिबु कुमार पत्रकार वेस्टर्न मुंबई इत्यादी उपस्थित होते.