
वसई: मौजे पेल्हार येथील वसई फाटा, मणीचा पाडा आणि जाबर पाडा परिसरातील रस्ता आठ दिवसांत न बनविल्यास सदर परिसरात बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष श्री सुभाष साटम यांनी दिला.
सदर परिसरात खड्डेमय रस्त्याचा मुद्दा उपस्थिती करुन भाजपा पालघर जिल्हा आदिवासी आघाडी उपाध्यक्ष श्री. मधुकर तरे यांनी एक दिवसीय धरणा आंदोलनाचे आयोजन केले. सदर आंदोलनात परिसरसतील ५०० नागरिक, रिक्शा चालक तसेच टेंपो चालकांनी सहभाग घेतला.
सकाळी १०. वा . पेल्हार महापालिका विभागीय कार्यालया बाहेर भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष साटम साहेब यांच्या नेतृत्वाखाली धरणा आंदोलनास सुरुवात झाली.
सदर आंदोलनास समोरे जाण्यासाठी प्र. सहाय्यक आयुक्त दिपाली ठाकूर उपलब्ध नव्हत्या. दिपाली ठाकूर यांनी जाणुन बुजून कार्यालयीन कामाचे कारण देवून आंदोलनाकडे पाठ फिरविल्याची चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होती.
आंदोलनाचे फलक सदर परिसरात लागताच जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सदर परिसरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी मिश्रित माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.
आज सकाळी आंदोलनात नागरिकांना जाण्या पासून रोखण्यासाठी नगरसेविका अंजली पाटिल यांनी मणीचा पाडा येथील विद्युत रोहित्रा जवळ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. त्यावरून सदर परिसरातील रस्त्यांची खरोखर अवस्था दयनीय असल्याचे एक प्रकारे नगरसेविका अंजली पाटिल यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले असे मत मधुकर तरे यांनी स्पष्ट केले.
प्र.सहाय्यक आयुक्तांच्या अनुपस्थितीत महापालिका अधिकार्यां बरोबर झालेल्या बैठकीत आठ दिवसांत नवा रस्ता बनविण्यात आला नाही तर बेमुदत रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष साटम साहेब यांनी दिला.
