सार्वजनिक शौचालयाची झाली दुर्दशा, दुर्गंधजन्य परिसरामुळे आरोग्यास हानिकारक..
वरील वृत्तानुसार वसई पच्छिम पारनाका येथे असलेले वसई मार्केट हे जुने आणि सुरवाती पासूनच गजबजलेले मार्केट आहे. इथे दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले सर्व प्रकारचे सामान, खाद्यपदार्थ, कपडे, फळे - भाजी, हार - फुले इत्यादी सर्व प्रकारचे व्यापार असून अनेक लहान - मोठे व्यापारी इथे आपला व्यापार करत असतात. त्यामुळे इथे ग्राहक वर्गाची रेलचेल जास्तच असते. अशातच ह्याच वसई मार्केट मध्ये असलेले वसई विरार शहर महानगपालिका प्रभाग समिती आय चे कार्यलय असून ह्या कार्यालयाचा तळमजला फळ - फुल - भाजी विक्रेते आणि इतर व्यापारी यांना देण्यात आला आहे. ह्या सर्व व्यापारी - विक्रेते यांच्या कडून नियमित कर घेतला जातो. परंतु इथे ज्या हार - फुल विक्री करणारे विक्रेते आहेत ज्यात महिलांचा समावेश जास्त आहे. त्यांच्या वर नियमित कर देऊन सुद्धा अन्याय होत आहे. कारण मार्केट बाहेर अन्य फुल विक्रेते अनधिकृत पने बसलेले असतात, ज्यामुळे ग्राहक बाहेरूनच हार - फुल खरेदी करून निघून जातात. ज्यामुळे नियमित कर भरणाऱ्या आतील हार फुल विक्रेते यांच्या धंद्यावर आपसूकच परिणाम होत आहे. तसेच ह्याच हार - फुल विक्रेते ह्यांच्या बाजुला असलेले जे सार्वजनिक शौचालय आहे ते अत्यंत दुर्दशा झालेले असून त्यामुळे तेथील वातावरण सतत दुर्गंधीयुक्त असते, ज्यामुळे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे विशेष करून महिला विक्रेते - व्यापारी यांची अत्यंत गैरसोय होत आहे. विशेष आश्चर्य म्हणजे हे शौचालय प्रभाग समिती आय च्या कार्यलय खाली तळमजल्यावर आहे. आणि ह्याच कार्यालय मधील कर्मचारी पासून ते अधिकारी वर्गापर्यंत असलेले सर्व लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी ह्या सर्व प्रकाराकडे जर महापालिका प्रभाग समिती आय ने कोणत्याही प्रकारे लक्ष न देता ह्या समस्येवर तोडगा न निघाल्यास व्यापारी वर्गाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त झालेल्या व्यापारी यांनी दिला आहे.