वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेने शहरातील तलाव सुशोभित करून शहरवासीयांसाठी विरंगुळ्याचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण या तलाव सुशोभीकरणाच्या प्रकियेत ठेकेदारांनी मात्र पालिकेची तिजोरी साफ करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असाच काही प्रकार वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रातील वसई पश्चिमेला असलेल्या पापडी तलावाच्या  सुशोभीकरणाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.या तलावाच्या सुशोभीकरणासाठीठेकेदाराने  रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर केल्याने या तलावाचे सुशोभीकरण वादात सापडले आहेत.ठेकेदारांने रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर केल्याने ठेकेदार मुकेश ब्रदर्सला चक्क दोन वेळा नोटीस देऊन ताकीद दिली होती. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने संबंधित ठेकेदारांने आपल्या कार्यपद्धतीत कोणताच बदल केला नाही. परिणामी साडेचार करोड रुपये खर्च करूनही आजही या तलावाचे अपूर्ण अवस्थेत आहे.त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.      दरम्यान या सुशोभीकरणाच्या कामाची चौकशी तसेच मुकेश ब्रदर्सचा ठेका रद्द करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती.पण तत्कालीन आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी न केलेल्याने ठेकेदार आजही मोकाट आहे.त्यामुळे नवनियुक्त आयुक्त बळीराम पवार या प्रकरणी  काय भूमिका घेतात याकडे वसईकराचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या तलावाचा ठेका मंजूर करणारे पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांची भूमिका संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मुख्यत्वेकरून लाड हेच संबंधित ठेकेदारांची पाठराखण करताना दिसत आहेत.या तलावा संदर्भात तक्रार घेऊन येणाऱ्या तक्रारदाराची केवळ आश्वासनावर बोळवण करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *