तहसीलदार कचेरी समोरील टपऱ्या उचलण्यात भेदभाव
:- डॉ. अरुण घायवट

वसई तहसीलदार कचेरी समोरील टपऱ्या आज उचलण्यात आल्या मात्र या टपऱ्या उचलताना काही राजकीय मंडळी करीत असलेली पाठराखण आणि टपरी उचलण्यास आलेले अतिक्रमण अधिकारी महेश पाटील यांची लाचखोर वृत्ती या कारणास्तव मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे. हप्ते देणाऱ्या टपऱ्याना अभय तर हप्ते न देणाऱ्या टपऱ्या वर कारवाई असे चित्र आज पहायला मिळाले त्यामुळे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागावर ताशेरे ओढले जात आहे. वसई तहसीलदार कचेरी समोर १५० चे वर टपऱ्या आहेत. या सर्वच टपऱ्या बेकायदेशीर आहे. मात्र गोर गरीब जनता तेथे आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे. यातील काही टपऱ्या धारक वेगवेगळ्या ठिकाणी हप्ते देऊन आपली पाठराखण करीत आहेत. काही टपऱ्या लाखो रुपयात विकल्या गेल्या आहेत. मात्र गोर गरीब लोक आपले पोट भरून उपजीविका चालवत आहेत.त्यामुळे या भ्रष्ट कारभारावर दुर्लक्ष करण्यात आले होते. टपरी धारक यांच्या हप्त्यातुन मिळणाऱ्या पैशावर काही जण गबर झाले आहेत. या टपऱ्या धारक कडून एक हप्ता महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाला जातोय. असे असताना काल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तहसीलदार कचेरी समोरील काही निवडक टपऱ्या कोणतीही पूर्व सूचना न देता उचलून नेल्या आहेत. खरतर पालिकेच्या आय विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. काही लोकांना एम आर टी पी ई ची नोटीस देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण दूर करावेत म्हणून तक्रारीचा पाऊस आहे मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागातील सह आयुक्त आणि अतिक्रमण विभाग प्रमुख महेश पाटील हे जाणीव पूर्वक गोर गरीबांचे अतिक्रमण वर कारवाई करीत आहेत आणि मोठ्या लोकांनी केलेल्या अतिक्रमण वाचविण्यासाठी त्यांची दलाली करीत आहेत. या विभागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर टपऱ्या आहेत मात्र त्या टपऱ्या कडून हप्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही मात्र हप्ते मिळत नसलेल्या टपऱ्यावर जाणीव पूर्वक कारवाई केली जात असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागावर ताशेरे ओढले जात आहे. कालच्या कारवाई नंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. महेश पाटील यांना निलंबित करा अशी मागणी आता होणार असल्याचे सूतोवाच मिळत आहेत. पालिकेचे अतिक्रमण विभाग लाचखोरीत गाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *