
वसई, दि.२१ (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वसई – विरार जिल्हा युवक काँग्रेस व ट्रान्सफ्रीग्रेशन हेल्थकेयर सोसायटी तर्फे दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी स्व.जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराला वसई-विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आलमेडा, काँग्रेस नेते विजय पाटील यांनी स्व.जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केले. राज्यात रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासल्याने रक्तदान करणे शिबीर घेणे गरजेचे झाले होते. गरजूंना वेळेत पुरेशे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र भर रक्तदान करण्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आव्वाहन केले होते. प्रत्येक रक्तदात्याला वेगळी वेळ देऊन गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. २८ मार्च २०२० पासून वसई-विरार जिल्हा युवक काँग्रेसनी रक्तदान करण्याची मोहीम सुरू केली. आज वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस तर्फे सातवे रक्तदान शिबिराचे आयोजन प्रेम यादव स्कूल , नायगाव (पूर्व) येथे करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रमाणेच समाजातील इतर नागरिकांनी रक्तदानासाठी समोर येऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदवीण्याची गरज आहे. यामुळे गरजूंना वेळेत रक्त मिळण्यास मदत होईल. नायगाव येथे आज पावसाचे प्रमाण जास्त असूनही स्व.जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या प्रेमापोटी रक्तदात्यांनी शिबिरात येऊन रक्तदान केले त्यामुळे वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. ह्या शिबिरात राल्सन डिसुझा, प्रिया चंद्रा, अंकिता वर्तक, डॉ. जॉय रोड्रिग्ज, हेजल अथायत, साहिल वाझ यांचे विशेष सहकार्य लाभले.