
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून वसई विरार क्षेत्रात ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्तच प्रमाणात वाढत आहे. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका नियोजन शून्य कारभार व निष्काळजीपणे ही गंभीर परिस्थिती हाताळत आहे. याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा जी जी कॉलेज, वसई येथील कोरोना बाधित रुग्णांच्या आयसोलेशन सेंटर मध्ये घडत आहे.. ह्या सेंटर मध्ये वसई विरार क्षेत्रातील सर्व कोरोना बाधित रुग्णांना आणले जात आहे. परंतु ह्या रुग्णांना इथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व सुविधा दिली जात नाही आहे… इथे जेवण नाश्ता चे २५०/- रुपये याप्रमाणे दर लावले जात असून सुद्धा इथल्या कोणत्याही कोरोना रुग्णांना वेळेवर ना चहा नाष्टा दिला जातो, ना ही वेळेवर जेवण येत, तसेच सतत गरम पाणी पिण्यास सांगण्यात येते.. परंतु इथे चुकून कधी तरी गरम पाणी आणण्यात येते. तसेच इथे महिला व पुरुष ह्यांना कॉमन बाथरूम ची व्यवस्था करण्यात आली आहे.. यामुळे त्यांना अवघडल्यासारखे झाले आहे.. त्यांचे अतोनात हाल होत आहे. एकही कर्मचारी हे ह्या रुग्णांना जे राहण्यासाठी तीन माळे दिले आहेत तिथे येत नाही. महत्वाचे म्हणजे इथे गेल्या काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालय मधील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत जे कोविड पॉझिटिव आले होते त्यांना सुद्धा इथेच ठेवण्यात आले आहे.. जर ह्या अधिकारी वर्गाची अशा परिस्थितीत जर हे हाल होत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचे…?? की फक्त कोरोना च्या नावाने लोकांची लूट करण्यात येणार आहे..?? इथे जर अशा परिस्थितीत एखाद्याला अपुऱ्या व्यवस्थेमुळे जीव गमवावा लागला तर ह्याला कोण जबाबदार..?? इथे लहान मुलांपासून ते मदयांपर्यंत, वयस्कर व्यक्ती तसेच गर्भवती महिला सुद्धा आहेत.. त्यांची काळजी घेणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे की नाही..?? ही अत्यंत बेजबाबदार व निष्काळजी पने महानगरपालिकेची वागणूक असून कोरोना च्या नावाने काळाबाजार मांडला असून लोकांची लूट केली जात आहे असे सामाजिक कार्यकर्ते श्री तसनीफ नूर शेख यांनी म्हंटले आहे.