प्रतिनिधी : वसई विरार शहरातील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार २०२१ मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद नवी दिल्ली येथील राष्ट्रीय क्रिडा दिवसा निमित्ताने मिरज सांगली या ठिकाणी पुरस्कार प्रधान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील RSKA असोसिएशन च्या खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. श्री. जयवंतराव पाटील (राज्य मंत्री) यांच्या हस्ते रिआँन बर्नड लोपीस, आदित्य अरविंद इटम, हेमानी प्रदीप मेहेर, अभिषेक राजेश मेहेर व प्रशिक्षक रितेश प्रजापती यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपल्या वसई तालुक्यातील मुलानी सांगली मिरज या ठिकाणी जाऊन पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल वसई तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री. हितेंद्र ठाकूर व युवा आमदार क्षितिज ठाकूर व पंकज ठाकूर यांनी खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अशाच प्रकारची कामगिरी करत रहा व वसई तालुक्याचे नाव रोशन करा सर्व खेळाडूंना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *