
पाच वर्षासाठीचा भागिरथी ट्रान्सपोर्ट सोबतचा करार खाजगी पध्दतीने केला दहा वर्षांसाठी
अति.आयुक्त संजय हेरावडे यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

वसई विरार पालिकेचे अधिकारी वर्ग खाजगी ठेकेदारांसाठी सध्या राबताना दिसत आहेत.एकप्रकारे वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांच्या इशाऱ्यावर पालिकेचा कारभार हाकत आहेत.पालिकेचे अति.आयुक्त संजय हेरावडे यांनी भागिरथी ट्रान्सपोर्टला मुदतवाढी साठी पाठवलेल्या प्रस्तावातून हे उघडही झाले आहे.आधीच पालिकेने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून पाच वर्षासाठीचा भागिरथी ट्रान्सपोर्ट सोबतचा करार खाजगी पध्दतीने दहा वर्षांसाठी केला होता. पण हे सर्व उघड होऊ नये यासाठी दी.२१/०५/२०१८ रोजी परिवहन सेवेस मुदतवाढ मिळावी म्हणून नगर विकास विभागाकडे मुदतवाढीसाठी अति. आयुक्तांनी पठवलेला प्रस्ताव म्हणजे भागिरथी ट्रान्सपोर्टला वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपा जिल्हा सचिव चरण भट्ट यांनी केला आहे.सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने भागिरथी ट्रान्सपोर्टचा करार रद्द करून ठेकेदारास सहकार्य करणारे अति. आयुक्त संजय हेरावडे यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी भट्ट यांनी केली आहे.तसेच करारनाम्यावरती ज्या अधिकारी व संबंधित व्यक्तींची स्वाक्षरी आहे त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. याबाबत भट्ट यांनी गृहविभागाकडे कारवाईसाठी तक्रार दाखल केली असून कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून खासगी पद्धतीने पाच वर्षासाठीचा भागिरथी ट्रान्सपोर्ट सोबतचा करार महापालिकेने दहा वर्षांसाठी केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक ५/७/२०११ रोजी जाहीर केलेल्या पत्रानुसार वाहनांची मुदत पाच वर्ष इतकी निर्धारित करण्यात आली होती. या अटीच्या अधीन राहून परिवहन सेवा उपक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. असे असताना परिवहन सेवा उपक्रमांतर्गत बसेस चालवण्याबाबत चा करारनामा दहा वर्ष कालावधीसाठी करण्यात आला आहे.विषेश म्हणजे दी.२१/०५/२०१८ रोजी परिवहन सेवेस मुदतवाढ मिळावी म्हणून नगर विकास विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. एकीकडे आधीच खासगी पद्धतीने १० वर्षांचा केला असताना पुन्हा मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवल्याने पालिकेच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच प्रस्ताव पाठवणारे पालिकेचे अति.आयुक्त संजय हेरावडे यांची भूमिकाही संशयास्पद स्वरूपाची असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. वसई विरार शहर पालिकेने परिवहन सेवा दी.३/१०/२०१२ पासून सुरू केली.पालिकेने परिवहन सेवे चा ठेका रॉयल्टी बेसिसवर भागिरथी ट्रान्सपोर्ट याठेकेदाराला चालविण्यासाठी दिला आहे.सध्या भागिरथीच्या ताफ्यात एकूण १४९ बसेस असून ४३ मार्गांवर चालविण्यात येत आहेत.वारंवार होणाऱ्या अपघातामुळे तसेच पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पालिकेची परिवहन सेवा पंक्चर झाली आहे. एकप्रकारे भागिरथी ट्रांसपोर्ट ही खासगी कंपनी वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा चालवण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे.त्यांच्या बसेसही धोकादायक झाल्या आहेत. करारानुसार ३ वर्षांत ४०० बसेसची सुविधा न पुरविणे पुरविलेल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही मार्गांवर सुरू असलेली परिवहन सेवा कुचकामी ठरत आहे.पालिका प्रशासन परिवहन सेवेचा शहरवासीयांना फायदा होत असल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात मात्र परिवहन सेवा कुचकामी ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे प्रवाशांना आजही रिक्षाचाच आधार घ्यावा लागत आहे. बस आगर नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते.परिणामी शहरवासीयांना या परिवहन सेवेचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. उलटपक्षी ठेकेदाराचा मात्र फायदा होत आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या भल्यासाठीच सदरची परिवहन सेवा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.तसेच परिवहन समिती भागिरथी ट्रान्सपोर्टच्या फायद्यासाठी ठराव मंजूर केले जात असल्याचे पुढे येत आहे.ReplyForward |