
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च २०२० मध्ये झालेल्या प्रभाग रचनेबाबत व आरक्षण सोडतीबाबत नागरिकांकडून काही हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने नागरिकांकडून आलेल्या एकूण १७ हरकतींची सुनावणी दि.११/०९/२०२० रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय, विरार येथील स्थायी समिती सभागृहात मा.श्री.संजय मीना,अप्पर आदिवासी आयुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. सुनावणी झालेल्या हरकतींपैकी १६ हरकती ह्या फेटाळण्यात आल्या असून श्री.गिरीश दिवाणजी यांनी प्रभाग क्र.२१ व २३ च्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत घेतलेली १ हरकत मान्य करण्यात आली असून त्याचा अंतिम अहवाल महानगरपालिकेमार्फत निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
