वसई  :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. परंतु नागरिक शासनाने लागू केलेले आदेश पळत नसल्याचे दिसत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आता पर्यंत 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती पासून इतर नागरिकांना लागण होण्याची शक्यता असल्याने कोरोनाच प्रादुर्भाव वाढूनये यासाठी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाजीपाला दुकाने 9 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
करोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला तसेच राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थती असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरू नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे अपेक्षित असताना वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात भाजी मंडईमध्ये गर्दी करताना दिसत आहेत तसेच सोशल डिस्टसिंग (social distancing) पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच नागरिक संचारबंदी आदेशाचा भंग करीत आहेत. याबाबत कायदेशीर कारवाई करूनही जनतेच्या वर्तनात फरक पडलेला नाही. या मुळे वरील परीसरात कोव्हीड-१९ चा मोठया प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच नागरिक आवश्यक वस्तू घेण्यासाठी गर्दी करत आहेत .ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील भाजी मंडई ४ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
पालघर जिल्हयातील वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक भाजीपाला घेण्याच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर घराबाहेर पडून स्वताच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत.नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षनाकरिता तसेच कोहीड-१९ चा प्रसार होऊ नये, या करीता वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रा मधील भाजीपाला बाजार व सर्व भाजीपाला दुकाने सोमवार दि.6 एप्रिल ते गुरुवार दि.9 एप्रिल असे 4 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *