
कोरोना काळात जनतेला महानगरपालिका कार्यालयात प्रवेश बंद करून अधिकारीची जनतेच्या पैशावार लुटमार !


वविशम नालासोपारा प्रभाग समिती ई अंतर्गत वाॅर्ड क्रं ५६ मधील वाघोली नाका परिसरातील पावसाळी पाण्याच्या निचरा हा वाघोली वाघेश्र्वरी मंदिर मार्गे वाघोली खारातलाव लगत असलेल्या खाडीत जातो.
आजपर्यंत वाघोली गावात व वाघोली नाका येथे पावसाळी पाणी साचला नाही. तरीही महानगरपालिकेचे मुख्य अभियंता राजेेंद्र लाड ,प्रभाग समिती ई चे अभियंता आर के पाटील, व कनिष्ठ ठेका अभियंता नरेंद्र संखे च्या माध्यमातून इतिहासातील पहिल्यांदाच घटना असेल तलावातून पाणी उघडी माध्यमातून खाडीत जात असतानाही पावसाळी पाण्याच्या निचरा होण्यासाठी तलाव क्षेत्रात गटार (नाला बांधकाम स मंजुरी देवून तब्बल नव्वद लाख रूपये खर्च करून बांधकामास सुरूवात केली आहे.
ग्रामस्थाची कोणतीही मागणी नाही व पावसाळ्यात गावात कोणतीही पुरपरिस्थिती नाही परंतू तौसिफ मनुद्दीन कली रा.खारखंड्डी आळी सोपारा बाजार ह्याच्या वैयक्तिक हितासाठी वरील नाला बांधकाम होत आहे.
स्थानिक वाघोली गावात सोज तलाव, भादाळे तलाव सुशोभिकरण गेल्या सहा वर्षांपूर्वी मंजूर होवून कामास सुरवात नाही, वाघोली भादाळे तलाव सरंक्षित ग्रिल कंपाऊड गेल्या दिडवर्ष अर्धवट अवस्थेत पडलेल आहे नाळा मच्छी मार्केट येथील तलावाचे काम गेले चार वर्ष अर्धवट अवस्थेत आहे ते पुर्ण होत नाही ,वाघोली सोरटापाडा आदिवासी वस्ती रहिवासी रस्ता करीता आलेले पाईप परत जातात तीन पिढ्या रहिवासी असलेल्या या ग्रामस्थांना रस्ता नाही. स्थानिक शेतकरांचा जागेतून व पावसाळ्यात चिखलातुन जावे लागते व आजारी व्यक्तीना जाण्यासाठी डोली तयार करावी लागते त्याचा महानगरपालिका होवून दहा वर्षात रस्ता होत नाही, वाघोली ह्या खारातलाव लगत वाघेश्र्वरी मंदिराची जमीन व स्थानिक शेतकरांची जमीन असून ह्या तलाव मालकाचा जमिनीबाबत वादविवाद आहे त्या करीता तलाव मालक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाला बांधकाम करून जमीनीची सरहद्द निश्चित करण्याच प्रयत्न करीत आहे.
एस्सी कॅबिनीत बसून अभियंता प्रत्यक्ष जागेवर न येता बांधकाम मंजुरी कशी देत आहे? या बांधकाम बाबत स्थायी समितीत कोणी आणला व त्यास मंजुरी कोणी दिली की आयुक्त साहेबांनी स्वतः अधिकारात निर्णय घेतला हे जनतेला कळणे अत्यावश्यक आहे.
तलावातून पावसाळी पाण्याच्या निचरा होण्यासाठी गटार बांधकाम करून तलाव स लागून असलेल्या खाडीत पावसाळी पाणी जात असतानाही बांधकाम करावे जेणेकरून ठेकेदार कर्मचारी अधिकारी जनतेला नेमकं कोणता संदेश देत आहात?
वाॅर्ड क्रं ५६ मधील ह्या बांधकाम माध्यमातून जनतेच्या कररूपातील पैशाची वैयक्तिक लाभाकरीता लयलूट करत असताना जनतेची मागणी नसूनही बांधकाम थांबवीण्याबाबत अभियंता आर के पाटील कोणतीही हालचाल करीत नाही या बाबत सर्व स्थानिक जनतेने, आदिवासी बांधवांनी ,मंदिर व्यवस्थापन समिती ने पुढाकार घेऊन महानगरपालिका आयुक्ताना घेराव घालून जाब विचारण्याची आता गरज आहे.
आजही जनतेने मागणी केलेली काम होत नाहीत परंतू वैयक्तिक लाभाकरीता महानगरपालिका कामकाज करीत आहे ह्याची वरीष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे.