★ वसई-विरार भाजपाची जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न!

वसई : गेल्या काही दिवसंपूर्वी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार भाजपा जिल्हा कार्यकारिणीची नालासोपाऱ्यातील बालाजी हॉल येथे बैठक संपन्न झाली. यावेळी वसई-विरार मधील सहा मंडळाचे पदाधिकारी तसेच मोर्चा आणि प्रकोष्ठ चे प्रमुख उपस्थित होते. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश महासचिव व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच प्रदेश उपाध्यक्ष खासदार कपिल पाटील उपस्थित होते.
वसई-विरार महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे वसई तालुक्यात भाजपाने निवडणुकीची जय्यत तयारी करत असल्याची राजकीय पातळीवर चर्चा होत आहे.
प्रमुख पाहुणे रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना समबोधित करताना, विकासाच्या बाबतीत वसई-विरार 25 वर्ष मागे आहे. याचे जिवंत उदाहरण नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महानगरपालिका आहेत. नागरिकांमध्ये बविआ बद्दल प्रचंड नाराजी आहे. वसईत झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे वसईत दरवर्षी साचणारे पाणी असो तसेच कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता हा युद्धपातळीवर तालुक्यात कार्यरत होता हे नागरिकांनी पाहिलेले आहे. भाजपाकडे वसई-विरारमधील जनतेला अपेक्षा आहेत. त्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने बूथ लेव्हलवर काम करावे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन होतील तेवढ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी यावेळी बोलताना, महानगरपालिका क्षेत्रातील 115 च्या 115 अशा संपूर्ण वार्ड वर भाजपाचे उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी उभे राहणार आहेत. तशी तय्यारी आम्ही केली आहे. यावेळी भाजपाचा महानगरपालिकेत डंका वाजणार अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. कोणाच्याही गुंड शाहीला घाबरण्याची गरज नाही जिल्हाध्यक्ष म्हणून भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी मी उभा असेन. असे बोलत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बळ दिले.
यावेळी खासदार कपिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *