वसई (प्रतिनिधी) :- वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीतील मौजे राजीवली येथील सर्व्हे नंबर १५६/२ या जमिनीवर उभारण्यात आलेली आरसी मारुती हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालयाची इमारत अनधिकृत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांनी उघड करीत सदर इमारत जागा मालकासह विकासक आणि भोगवटदार यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.त्यानुषंगाने मौजे राजीवली येथील सर्व्हे नं.१५६/ २ अ या जागेत तळ अधिक 1 मजल्याची आरसी मारुती हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालयाच्या नावाने इमारत उभारली आहे.दरम्यान सदर इमारतीची कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेतलेली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झाली आहे.तसेच याबाबत मनपाच्या वालीव प्रभागात २४ जानेवारी रोजी केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानेही उभारलेल्या जागेतील विद्यालयाच्या इमारतीची कुठलीही परवानगी नसल्याचे समजते.परंतु असे असतानाही सदर इमारतीचे बांधकाम १० एप्रिल पासून अनधिकृतपणे सुरूच असल्याने संबंधित भूमाफिया बांधकाम विकासक, मालक यांना प्रशासनाच्या कारवाईचा धाक राहिलेला दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद केले असून या आरसी मारुती विद्यालयाच्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या संबंधितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे अनुसार एमआरटीपी अंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वसई विरार महापालिका आयुक्त व संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed