
जलभराव उपाययोजना काम शून्य आरटीआय मध्ये पत्रकार कमर बेग नीं केला उघड ….
विरार: असे म्हटले जाते की जेव्हा-जेव्हा निसर्गाशी खेळ केला जातो तेव्हा निसर्ग आपले भयावह रूप दाखवतो पर्यावरणाशी झालेल्या खेळामुळे संकट येतच आहेत. निसर्गाच्या सावलीने नटलेल्या वसई विरारच्या बाबतीत हिरवाईने भरलेल्या तालुक्यामध्येही असाच प्रकार घडला आहे. या शहरात नैसर्गिक नाले, तलाव यांवर होणारे अतिक्रमण, डोंगर-जंगलांची बेसुमार कत्तल, वाढत्या नागरीकरणामुळे हरितनगरीचे काँक्रीट शहरात रूपांतर होत आहे. या कारणांमुळे मुसळधार पावसात वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.अनेक भागातील घरे आणि दुकाने अनेक दिवस तुंबून जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला शाररीक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्या लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नातून,निरी व आई आई टी मुम्बई
मार्फ़त आलेले अधिकारी, स्थानिक नगरसेवक, स्थानिक नगरिक व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून सप्टेंबर 2018 मध्ये पाण्याचा निचरा करण्याबाबत उपाय योजनांसाठी लोकांच्या समस्या जाणून घेऊन सर्वेक्षण केले गेले. प्रत्येक प्रभागात सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या समस्या तोंडी आणि लेखीही मांडल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, निरी व आई आई टी मुम्बई ना वसई विरार मध्ये पाणी साचण्यावर उपाय योजनांचे सर्वेक्षण आणि अहवाल देण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी त्यांवर तांत्रिक टीमसह वसई विरारच्या समस्या ग्रस्त भागांना भेटी दिल्या आणि स्वतःच प्राधान्यक्रम तयार केला आणि त्यानंतर अंतिम अहवालही सुपूर्द करण्यात आला. हा प्रकार माहितीच्या अधिकारा खाली मागवलेल्या माहिती मध्ये उघड झाला की महानगरपालिकेकडे या सर्वेक्षणासाठी दिलेले एकूण १२ कोटी रक्कम देण्यात आली परंतु संपूर्ण रक्कम किती असल्याची माहितीच देण्यात आली नाही.
या गंभीर प्रकरणावर सक्रिय सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते कमर बेग यांनी माहिती अधिकार खाली अर्ज देऊन निरी व आई आई टी मुम्बई च अहवाल याची माहिती मागवली, त्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने अहवाल दिला, परंतु अहवालानुसार कोणत्या ठिकाणी उपाय योजना वर काम केले गेले याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यादा केलेल्या माहिती अधिकारावर माहिती देण्यात आली कुठे कुठे काम केले गेले त्यंच मध्ये निरंक दिलेला आहे । आणि आई आई टी मुम्बई आणि निरीह ला दिलेला पेमेंट मध्ये 12 कोटी दिलेला पत्र सोबत दिलेला आहे . या गंभीर प्रकरणावर महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी आणि निरी अहवालावर काम करण्यासाठी 300 कोटींहून अधिक रक्कम लागणार असून काम करण्यासाठी पालिकेकडे बजेटच नाही. सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते कमर बेग यांच्या मते या उपायासाठी 300 कोटी जरी वापरायचे असले, तरी एकाच वेळी नाही तर टप्प्याटप्प्याने अनेक टप्प्यांत काम करता येईल. पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून ज्या योजनेचे काम व्हायला हवे होते, त्या योजनेची कामे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कंत्राटदारांना पैसे दिले जातात, त्यावर अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि महापालिकेने लवकरात लवकर पाणी साचण्याच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत.आयुक्त अनिल पवार
या गंभीर विषय वर काय पाऊल उचलनार तो पाहवा लगेगल
◆ वसई विरारमध्ये मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होत असून, सप्टेंबर 2018 मध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी तुंबण्याची समस्या समजून घेऊन त्यावर उपाय योजना तयार करण्याचे काम करायचा प्रयत्न केले.महापौरांसह, सभापती, नगरसेवक,महापालिका अधिकारी, निरी आणि आयआयटीच्या तांत्रिक पथकाने प्रत्येक प्रभाग क्षेत्रात संवाद कार्यक्रम आयोजित करून समस्या समझुन घेणे चा प्रयत्न केला होता. त्यानंतर तांत्रिक पथकाने संपूर्ण सर्व्हे करून त्याचा प्राधान्यक्रम अहवाल व अंतिम अहवाल दिला, प्रशासनावर काम करण्याची पाळी आल्यावर त्यांनी पाहणी अहवालाचा १२ कोटीं दिले आणि अहवालावर काम झाले नाही. सर्वेक्षण अहवालासाठी जनतेच्या कष्टाच्या कराच्या पैशातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांचे मानसिक, शारिरीक त्रास वाचता यावेत यासाठी लवकरात लवकर पाणीभराव उपाययोजना वर पूर्ण नाही तर टप्पे टप्पे वर काम करण्याची मागणी करण्यात येत आहे । पाणी साचल्याने लोकाना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यांवर उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे.
कमर बेग
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते