मुकादम आणि :वाहन चालकांच्या नावाने पैसे उकळण्याचा ठेकेदारांचा घाट ! पत्रकार रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ!

Anc : वसई विरार महापालिकेच्या घन कचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पत्रकार रुबिना मुल्ला यांनी केला असून यामुळे महापालिका प्रशासनाला प्रचंड नुकसान सोसावं लागत असल्याने रुबिना मुल्ला यांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे ठेका देण्यात आलेल्या ठेकेदारांच्या कामाची माहिती एका पत्राद्वारे मागितली असता सदर माहिती देण्यास महापालिका टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने घन कचरा विभागात भ्रष्टचार सुरू असल्याचा संशय रुबिना मुल्ला यांनी व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे वरील सर्व ठेकेदारांनी वसई विरार महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपसात संगनमताने मजुरांची संख्या कमी करून हा ठेका फक्त मजुरांचा ठेका असतानाही त्याजागी मुकादम आणि वाहन चालकांच्या नावाने बिले उकळण्याचा घाट घातला जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.तसेच ठेकेदारांवर कारवाई ऐवजी त्यांना कॅबिनमध्ये बसवून आर्थिक साटेलोटे केले जात असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी किमान वेतन कायद्यानुसार कुशल कामगारांना डावलून अकुशल कामगारांना पगार देत असल्याचीही चर्चा नागरिकांमधून केली जात आहे.त्यानुषंगाने वसई विरार महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार घन कचरा विभागाने नेमून दिलेले ठेकेदार साई गणेश इंटरप्रायझेस झोन ३,१०,१६ हिना इंटरप्रायझेस झोन ८ आणि ११,अनंत इंटरप्रायझेस झोन १,५,९ उजाला इंटरप्रायझेस झोन २,१२,१३ रेनबो इंटरप्रायझेस झोन ४ ,दिनेश संखे झोन ६ आणि २०, मंदिप इंटरप्रायझेस झोन १८,आर. बी इंटरप्रायझेस झोन . शिवम इंटरप्रायजेस .रिलायबल एजेन्सीस आदि ठेकेदार कंपन्यांना मनपाच्या वेगवेगळ्या झोनचा घन कचरा व्यवस्थापनाचा ठेका लाखो रुपयांत देण्यात आला आहे.याबाबत रुबिना मुल्ला यांच्या माहिती अधिकारानुसार वरील सर्व ठेकेदार त्यांच्या हजेरी दस्तावेजात मजुरांच्या नावाने ऑफिसच्या आणि घरातील व्यक्तींसह मृतक व्यक्तींच्या नावानेही पैसे उकळण्याचा घाट घातला जात असून ठेकेदार घन कचरा व्यवस्थापनाचे पैसे घोटाळा करून स्वतःच्या घश्यात घालत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला असून या भ्रष्टाचाराबाबत रुबिना मुल्ला यांनी 16 जानेवारी रोजी २०१७ पासून वारंवार घन कचरा व्यवस्पथपानातील घोटाळ्याची माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करून सदर कंपन्यांना देण्यात आलेल्या ठेकेदारांच्या कामाबाबतची माहिती मागवली होती.परंतु त्यावेळी मनपाचे सेवानिवृत मुख्य जनमाहिती अधिकारी सुकदेव दरवेशी व इतर सर्व विभागाचे जनमाहिती अधिकारी केदारे , जितेंद्र नाईक, धुमाळ, गुंजाळकर आदींसह प्रथम अपिलीय अधिकारी नानासाहेब कामठे यांनी आपसात संगनमताने उडवा उडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली.आणि त्यानंतरही रुबिना मुल्ला यांनी ठेक्याच्या माहितीसाठी वारंवार स्मरण पत्र देवूनही वसई विरार महापालिकेने त्यास आतापर्यंत केराची टोपलीच दाखवली आहे.तर याबाबत रुबिना मुल्ला यांनी महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असता सदर कार्यालयातील कक्ष अधिकारी र. सु.साठे यांच्या लेखी पत्रानुसार रुबिना मुल्ला यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून रुबिना मुल्ला यांना माहिती देण्याचे आदेश ईमेल द्वारे कळवण्यात आले आहे.परंतु असे असतानाही मनपाचे वरील सर्व अधिकारी आपापसात संगनमताने रुबिना मुल्ला यांना घनकचरा ठेकेदारा संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर माहितीच्या अधिकाराची माहिती देण्याबाबतचा दिरंगाई अधिनियम कलम १९(८) क च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईची आर्तहाक रुबिना मुल्ला यांनी प्रशासनास केली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीसह लोकायुक्त कार्यालय संबंधित वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ? वसई विरार महापालिका आयुक्त सदर प्रकरणाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आदेश देणार का ? तसेच या भ्रष्टाचारात जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी सहभागी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल का ? याकडे समाजसेविका रुबिना मुल्ला यांचे लक्ष लागले असून त्यांच्याकडून न्यायाची मागणी होत असून या भ्रष्टाचारात जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी शामिल असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही समाजसेवक रुबिना मुल्ला यांनी माहिती अधिकारात शेवटी म्हंटले आहे.

टिप:- सर्व ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार,अपिलीय अधिकारी आणि वरिष्ठांपर्यंत आर्थिक साटेलोटे करून गैरव्यवहारातून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात भ्रष्टाचार होत आहे.

Byte :-
अपिली अधिकारी सुखदेव परदेशी यांच्यावर कारवाईसाठी नोटीस काढली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे.
अपिली अधिकारी – नानासाहेब कामटे

Byte:-
सुखदेव दरवेशी यांच्या विरोधात कारवाईसाठी काढलेली नोटीस सापडत नाही.
– दिपक जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed