नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश !

आयुक्त गंगाथरण डी.

विरार … वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता.
नवनियुक्त पालिका आयुक्त डी गंगाथरन यांनी 4 जून 2020 रोजी पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र या पत्रकार परिषदेला प्रमुख व ज्येष्ठ पत्रकारांना डावलण्यात आले होते तर काहींना कळवण्यात आले नव्हते.
यावर केवळ आपल्या प्रसार माध्यमांतून टीका करणे हा उपाय नसून पुढील काळात असे प्रसंग येऊन जनसमन्वयातील कमतरता दूर करण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांनी पालिका आयुक्त डी गंगाथरन यांना जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती .
या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढच्या आठवड्यात पालिकेसाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येईल! असे आयुक्तांनी पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांना सांगितले!
त्यामुळे वसई-विरार मधील पत्रकारांना जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व बातम्या दिल्या जातील! तसेच मी कोणत्याही पत्रकारांच्या विरोधात नाही ,माझे अनेक पत्रकार मित्र आहेत तरी पत्रकारांनी गैरसमज करून घेऊ नये ,लवकरच त्यांना गोड बातमी दिली जाईल असे पालिका आयुक्त डी गंगाथरन यांनी सांगितले.
या तातडीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल एनयुजे महाराष्ट्राच्या वतीने अध्यक्ष शीतल करदेकर यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *