
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर व सांगली येथे प्रचंड प्रजन्यवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शासकीय व बिगर शासकीय संघटनेकडून त्याठिकाणी मदत पाठवली जात असताना मात्र मदत वितराणा वेळी मागसवस्त्यावर पाहिजे तशी मदत मिळतं नव्हती.याची खंत मनात धरून रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी,मा. भास्कर कांबळे ,अभिजित खरात,बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.777 व संघर्ष सामाजिक संघटना यांनी वसई विरार मधील तमाम आंबेडकरी जनता व संघटना यांना वस्तुरूपी मदतीचे आव्हान केले हॊते.या आव्हानाला दाद देत अनेक संघटना व दानशुर बांधवाकडुन मदत प्राप्त झाली त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील सिद्धार्थ नगर करवीर तालुक्यातील शिंगणापूर कुरुकली आडे राधानगरी तालुक्यातील गुदालवाडी या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सुमारे 300 कुटुंबाकडे मदत….


