
हाथरस घटना ही किंवा मुलीची हत्या नसून नराधमांनी मानवतेची क्रूर हत्या केली आहे,
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १४ सप्टेंबर २०२०ला मनीषा नावाच्या गरीब वाल्मिकी समाजाच्या १९ वर्षाच्या मुलीला तिच्या आई समोर शेतातून उचलून नेले.या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.हे नीच कृत्य केल्यावरत्याने तिची जीभ कापली व तिला क्रुर पणेनमारहाण केली व तिला तिथेच सोडून गेले.ह्या मुलीचा दिल्ली येथील रुग्णालयात मृत्यू झाला.माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या मुलीचा जबरदस्ती अंत्यविधी उरकला.घरचे लोक विरोध करतील म्हणून त्यांना एका खोलीत डांबण्यात आले.बंदुकीच्या जोरावर पुरावे नष्ट करण्यात आले.त्यांच्या घरी जाण्यास सर्वांना मनाई करण्यात आली.
ह्या घटनेचा निषेध नोंदवताना राणी मुखर्जी यांनीअसे म्हटले आहे की संभाल के रखो अपनी फुल सी ओला दोको क्योकी देश चलाने वाले बेअवलात बैठे है.अशा शब्दात निषेध केला.
नालासोपारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कुमार काकडे यांनी नालासोपारा येथील चौकात योगी च्या प्रतीकात्मक फोटोला चपलांचा हार घातला व त्याच्या कार्यकर्त्याने जोडे हाणले .अशाप्रकारे निषेध नोंदवला.
वसई विरार जिल्हा काँग्रेसने योगी चा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला ह्यावेळी वसई काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री- ओनिल आल्मेडा व कार्याध्यक्ष श्री-प्रकाश पाटील,वरिष्ठ उपाध्यक्ष -श्री-बिपिन कुटीनो,दिनेश कडुळकर .
वसई-विरार महिला अध्यक्ष- सौ-प्रवीण चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्त्या रोहिणी कोचरेकर .वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष- श्री-कुलदीप वर्तक,अनिकेत पाटील.सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष- श्री-रतन तिवारी.
ह्या सर्वान च्या उपस्थितीत हा भाजपप्रणीत योगी सरकारचा निषेध कार्यक्रम पार पडला .