वसई.( प्रतिनिधि ) :- दिनांक 09 मे 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता वसई काँग्रेस भवन मधून ते तहसीलदार कार्यालय पर्यन्त कॅडंलमार्च ” वसई विरार शहर जिल्हा महीला काँग्रेस कमीटी तर्फे काढण्यात आला होता. महिला पेहेलवान वर होणाऱ्या अत्याचार विरूध्द व जंतंर मंतंर वर होणाऱ्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे तसे पत्र मा. तहसीलदार, वसई व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई यांना देण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणारे मा. कविता ताई, सचिव, महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस कमिटी व मा. प्रविणा ताई चोधरी , अध्यक्षा आणि मा. शमीम फिरोज खान, उपाध्यक्षा, वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी व लक्ष्मी मूठभटकल, राधा अय्यर, एऑन असीसी, नाज मॅडम अनेक महिला काँग्रेस पक्षप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *