महानगरपालिकेने देखील नोव्हेंबरमध्ये झालेल्या महासभेत आपत्तीग्रस्ताचा मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव पास केला त्या अनुषंगाने येत्या २०१९-२० च्या मालमत्ताकरात त्याचीअंमलबजावणी करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री राजाराम बाबर, उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण, विभागप्रमुख श्री शशिभूषण शर्मा , उमेश शिखरे यांनी मा आयुक्त श्री बी जी पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
वसई विरार शहरात पुन्हा पूरपरिस्थिती उदभवू नये यासाठी महानगरपालिकेने खाड्याची रुंदी आणि खोली वाढवणे , नाल्यावरील अनधिकृत बांधकामे हटवणे,, मिठागरातील कालवे पूर्ववत करणे , गास सनसिटी रोडवरील पूल समतल करणे, काही ठिकाणी खाडीचा मार्ग बदलला गेला आहे तो पूर्ववत करणे ,तुंगारेश्वर नदीचे पात्र पूर्ववत करणे ,गटारावरील गार्डन आहे त्याखालील गाळ काढणे, यावर निर्णयाक उपाययोजना करण्याचे व महानगरपालिकेची स्वतःची मलनिस्सारण केंद्र उभारण्याची मागणी शिवसेना नवघर माणिकपूर शहर शाखेतर्फ करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *