

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती एफ मध्ये अनधिकृत कामे अशा प्रकारे वाढली आहेत की, जसं एका झाडापासून सम्पूर्ण जंगल. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे व हातमिळवणी करून विकासक मात्र मोकाट झाले आहेत.अनधिकृत बांधकाम वाढत तर आहेतच त्याप्रमाणे भ्रष्ट अधिकारी ही आपले नाव गाजवत आहेत. आधीचे प्रभाग एफ चे सहाय्यक आयुक्त मोहन संखे भ्रष्टाचारसाठी प्रसिद्ध होतेच परंतु त्यांच्या मागे मागे नुकतेच नियुक्त झालेले सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम ही काही कमी नाहीत. ते ही त्यातलेच असे म्हणणे काही गैर नाही. नुकताच एक व्हिडिओ वायरल झाला होता , त्यात मोहन संखे यांनी अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील आणि अभियंता युवराज पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. वरून खालपर्यंत सर्व सारखेच असे स्पष्ट होते. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सध्या विकासकांची चांगलीच चांदी झाली आहे, कोणत्याही कायद्याचे पालन न करता निडर पध्दतीने विकासकातर्फे प्रभाग एफ मध्ये अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. विशेषतः उमर कंपाउंड औद्योगिक वसाहत, मायकल कंपाउंड , मनीचा पाडा, रिचर्ड कंपाउंड आणि पेल्हार लगतच्या लोडबेरिंग इमारती. प्रभाग समिती एफ मध्ये हजारोच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. अधिकाऱ्यांच्या संरक्षणाशिवाय सदरची अनधिकृत बांधकामे झालेली नाहीत. मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचते. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भ्रष्टाचाऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढू….
