
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत कुंभारपाडा येथे विनोद तिवारी याने शेकडो अनधिकृत खोल्यांचे बांधकाम केले आहे. आज ही या ठिकाणी धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे चालू आहेत. सदरची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून बांधकाम धारकांवर एमआरटीपी कायद्याने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती सी यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत कुंभारपाडा येथे विनोद तिवारी नामक भूमाफियाने शेकडो अनधिकृत खोल्यांचे बांधकाम केले असल्याची माहिती प्राप्त झाली असून या अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचे संरक्षण प्राप्त आहे. म्हणून तर भूमाफिया बेधडकपणे अनधिकृत बांधकामे करीत आहेत. या अनधिकृत बांधकामातून जमा होणारी लाचेची रक्कम मंत्रालयापर्यंत पोहोचविली जात असल्यामुळे मंत्रालयातून ही या अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळते.