
नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समितीच्या एफ हद्दीत अनेक हजार चौरस फूट जागेत विनापरवाना नूतनीकरण कायदा व नियम धाब्यावर बसवून महापालिकेच्या महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. , अनेक बातम्यांमध्ये प्रसिद्ध आहे परंतु महापालिका अधिकाऱ्यांना दिसत नाही आहे. पेल्हार महापालिका कार्यालयापासून केवळ 100 मीटर अंतरावर असलेल्या दुधवाला कंपाऊंडमध्ये अनेक चार मजली अनधिकृत इमारतींचे नवीन बांधकाम सुरू असून त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाबर पाडा, रिचर्ड कंपाउंड, पेल्हार महामार्गावरील सावला ढाब्याच्या मागे किंवा अवधूत आश्रमासमोर (तुषार लॉजच्या पुढे), राजू यादव, संतोष यादव, शिव मौर्य आणि अशोक यांनी मोठ्या प्रमाणावर खोल्या आणि गाळाचे अनधिकृत बांधकाम नव्याने केले.नवजीवन रोडवर असलेल्या भंगार गल्ली, धनीवबाग तलावासमोर, धनीबाग नाक्याजवळ, धनीबाई नगर किंवा घरत वाडीत, प्रभाग समिती फ चे सहआयुक्त मनोज वनमाळी, अतिक्रमण अधिकारी प्रमोद बर्वे आणि अतिक्रमण अभियंता हितेश जाधव यांचा अनधिकृत बांधकांमाना आशीर्वाद आहे, ज्यांचे सतत तक्रारी असूनही कारवाई नगण्य..? वरील बेकायदा बांधकामांमध्ये या अधिकाऱ्यांचा सहभाग नसेल, तर तक्रारी करूनही कारवाई का होत नाही..? वरील बेकायदा बांधकामांमुळे महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे का..? की वरील बेकायदा बांधकामांमुळे विभागीय अधिकाऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे..? असे प्रश्न उपस्थित होत आहे

